Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकता कपूरच्या या कार्यक्रमाला मागे टाकत द कपिल शर्मा शो पोहोचला चौथ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 12:42 IST

पहिल्या सिझन प्रमाणे द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या या सिझनला देखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्यात हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर होता. पण आता या कार्यक्रमाला चौथे स्थान मिळाले आहे. 

ठळक मुद्देचौथ्या स्थानावर कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो आहे. कपिल शर्मा शो गेल्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर होता. पण या आठवड्यात या कार्यक्रमाने बाजी मारली असून एकता कपूरच्या कुंडली भाग्य या मालिकेला मागे टाकले आहे.

कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या सिझन प्रमाणे या सिझनला देखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्यात हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर होता. पण आता या कार्यक्रमाला चौथे स्थान मिळाले आहे. 

गेल्या आठवड्यात टीआरपी रेसमध्ये एकता कपूरचा कसौटी जिंदगी की 2 हा कार्यक्रम पहिल्या क्रमांकावर होता. पण यंदाच्या आठवड्यात कुमकुम भाग्य ही मालिका पहिल्या क्रमांकावर असून शब्बीर आहुवालिया आणि सृष्टी झा यांची या मालिकेत मुख्य भूमिका आहे. गेल्या कित्येक आठवड्यापासून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावरच आहे. कुल्फी कुमार बाजेवला ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून या कार्यक्रमात सध्या सुरू असलेले आमायरा आणि कुल्फीमधील गाण्याची स्पर्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

एकता कपूरची नागिन 3 ही मालिका गेल्या आठवड्यात चौथ्या नंबरवर होती. पण या आठवड्यात या मालिकेने तिसऱ्या क्रमांकावर आपली जागा निर्माण केली आहे तर चौथ्या स्थानावर कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो आहे. कपिल शर्मा शो गेल्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर होता. पण या आठवड्यात या कार्यक्रमाने बाजी मारली असून एकता कपूरच्या कुंडली भाग्य या मालिकेला मागे टाकले आहे. कुंडली भाग्य ही मालिका पाचव्या क्रमांकावर असून सहाव्या क्रमांकावर कसौटी जिंदगी तर सातव्या क्रमांकावर ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका आहे. 

कपिल शर्मा सोबतच कृष्णा अभिषेक, भारती सिंग, किकू शारदा, अर्चना पुरणसिंग यांसारखे कलाकार द कपिल शर्मा शो चा भाग आहेत. कपिल शर्माच्या शो मध्ये नेहमीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार, राजकारणी, खेळजगतातील सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. गेल्या आठवड्यात या कार्यक्रमात कलंक या चित्रपटाच्या टीममधील आलिया भट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांनी कपिल आणि त्याच्या टीमसोबत धमाल मस्ती केली होती.  

टॅग्स :द कपिल शर्मा शोकपिल शर्मा