दर आठवड्याच्या टीआरपी रेटिंगबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. नेहमी पहिल्या स्थानावर असलेली माझ्या नवऱ्याची बायको मालिकेची यावेळी पिछेहाट झाली असून ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. लागीरं झालं जी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेत पहिला क्रमांक गाठला आहे.
टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या पाच क्रमांकात झी मराठीनेच बाजी मारली आहे. दरवेळी पहिल्या क्रमांकावर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका असते. मात्र ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. गुरूचा खोटारडेपणा राधिकाला कळलाय. ती शनायाच्या मदतीनं गुरूचं खरं रूप सगळ्यांसमोर आणले आहे.
नेहमी पहिल्या स्थानावर असलेली माझ्या नवऱ्याची बायको मालिका यावेळी मात्र दुसऱ्या नंबरवर आली आहे. गेल्या वेळी तिसऱ्या स्थानावर असलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका यावेळी चौथ्या स्थानावर आलीय.
तुझ्यात जीव रंगला तिसऱ्या नंबरवर आहे. या आठवड्यात राणादाची राजा बनून एंट्री झालीय. राणाचा मेकओव्हर आता प्रेक्षकांना कसा वाटतोय, ते कळेल. तुझ्यात जीव रंगला तिसऱ्या नंबरवर आहे.
प्रेक्षकांनी अज्या-शीतलीला भावनिक होत निरोप दिला होता आणि हा एपिसोड प्रेक्षकांनी जास्त पाहिला आहे.