Join us

Troll:ढिंण्चॅक पूजाच्या आगमनाने बिग बॉसच्या घरात भूकंप,टीव्ही सेलेब्सला फॅन्स म्हणाले हे वागणं बरं नव्हे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 13:54 IST

छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन ११ सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. घरातील सदस्यांमध्ये दिवसागणिक होणारे वाद यामुळे ...

छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन ११ सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. घरातील सदस्यांमध्ये दिवसागणिक होणारे वाद यामुळे बिग बॉस सुरुवातीच्या काही भागातच हिट ठरला आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री झालीय.दिल्लीची गायिका आणि रॅपर ढिंण्चॅक पूजा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून ढिंण्चॅक पूजा बिग बॉसच्या घरात दाखल होणार अशा चर्चा होत्या. सोशल मीडियावर ढिंण्चॅक पूजा प्रचंड लोकप्रिय आहे.तिच्या गाण्यांना नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद लाभतो. तिची हीच लोकप्रियता कॅश करण्यासाठी आता तिची बिग बॉसच्या घरात एंट्री झालीय. यामुळे ढिंण्चॅक पूजाचे फॅन्स खुश असले तरी बिग बॉसच्या घरात आधीच दाखल असलेले स्पर्धक मात्र हैराण झालेत. ढिंण्चॅक पूजाच्या लोकप्रियतेमुळे आपलं बिग बॉसच्या घरातलं महत्त्व आणि रसिकांचं प्रेम कमी होईल अशी भीती घरातल्या इतर सदस्यांना वाटू लागलीय.त्यामुळंच की काय ढिंण्चॅक पूजा घरात दाखल होताच बिग बॉसच्या घरातल्या काही सदस्यांनी तिची टिंगलटवाळी सुरु केली.ढिंण्चॅक पूजाबाबत ते वाईटसाईट गोष्टी बोलू लागले. इतकंच नाही तर तिच्या गाण्यावरुन,पर्सनालिटीवरुनही शेरेबाजी करण्यात आली.शिल्पा शिंदे, अर्शी आणि हिना यांनी तर ढिंण्चॅक पूजाच्या केसात ऊआ असल्याचे सांगत टर खेचली.तरीही आपल्या खास शैलीत ढिंण्चॅक पूजाने घरातील सदस्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला.ज्यारितीने घरातील इतर स्पर्धकांनी ढिंण्चॅक पूजाचं घरात स्वागत केलं ते रसिकांना आणि विशेषतः ढिंण्चॅक पूजाच्या फॅन्सना रुचलेलं नाही.ट्विटरवर ट्रोल करुन या सेलिब्रिटींच्या अशा वागण्याबाबत रसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे."आता हद्दच झाली,टीव्ही सेलेब्स ढिंण्चॅक पूजाच्या एंट्रीमुळे असे विचित्र वागतायत.साँस बहू मालिका तर एकप्रकारे टार्चर आहेत", असं मत एका फॅननं ट्विटरवर व्यक्त केले आहे.शिल्पा आणि हिनाच्या वागण्यावरही रसिक नाराज आहेत."मी ढिंण्चॅक पूजाचा फॅन नाही,मात्र ज्यारितीने शिल्पा आणि हिना तिच्याशी वागल्या हे पाहून निराश झालो." आणखी एकाने ट्विट केले की "हिनाने असं वागून स्वतःचंच हसू करुन घेतलं आहे."अशाप्रकारचे बरेच ट्विट सध्या पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडचा दबंग आणि बिग बॉस शोचा होस्ट सलमान खाननंही ढिंण्चॅक पूजाच्या एंट्रीवेळी तिची मजामस्करी करण्याचा प्रयत्न केला.सलमाननं तिच्यासोबत 'सेल्फी मैंने ले ली यार' हे गाणं गायलं.गाणं गाताना सलमाननं तिची मस्करीही केली.गाणं गाता गाता सलमाननं रसिकांना एक प्रश्नही केला की काय मस्करी सुरु आहे अशा गाण्यालाही तुम्ही हिट केलं.२ वर्षाआधी या गाण्याची कल्पना आली त्यावेळी तुझ्या डोक्यावर काय पडलं होतं अशा शब्दात सलमाननं पूजाची खिल्ली उडवली.