Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 15:13 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर नुकतेच ट्रिपल सेलिब्रेशन करण्यात आले. या मालिकेत डॉ. हाथीची भूमिका साकारणारे ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर नुकतेच ट्रिपल सेलिब्रेशन करण्यात आले. या मालिकेत डॉ. हाथीची भूमिका साकारणारे अभिनेते आझाद कवी, सोढीच्या भूमिकेत असणारे अभिनेते गुरुचरण सिंह आणि नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचा तिघांचाही १२ मेला वाढदिवस होता. या तिघांसाठी तीन केक मालिकेच्या टिमने आणले होते. त्यांनी तिघांनी सगळ्या टिमसोबत आपला वाढदिवस साजरा केला. तसेच आझाद कवी यांनी गिटार आणि बासरी वाजणाऱ्यांना खास वाढदिवसानिमित्त सेटवर बोलावले होते. यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले.