Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस १९' च्या ग्रँड फिनालेमध्ये धर्मेंद्र यांना श्रद्धांजली; सलमान खानला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 23:49 IST

बिग बॉसच्या १९ व्या सीझनच्या ग्रॅंड फिनालेला दमदार सुरुवात झाली आहे.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या १९ व्या सीझनच्या ग्रॅंड फिनालेला दमदार सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या सुरुवातीला सलमान पुन्हा एकदा धमाकेदार परफॉर्मन्ससह परतला. ग्रँड फिनालेचा हटके माहोल तयार करण्यासाठी बिग बॉसचे टॉप ५ सदस्य आणि एक्स-सदस्य यांच्या हटके परफॉर्मन्सने कार्यक्रमाला रंगत आणली.एकीकडे उत्साहाचं वातावरण असताना  यादरम्यान, शोमध्ये भावुक वातावरण पाहायला मिळालं. लाईव्ह शोमध्ये बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सलमानसह अन्य स्पर्धकही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय सिनेसृष्टीत अमुल्य योगदान देणारे जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते अजूनही सावरले नाहीत. धर्मेंद्र हे अभिनेता सलमान खानला तिसरा मुलगा मानायचे. ते बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये आवर्जून हजर राहायचे. या पर्वात धरमजींना मिस करत सलमान प्रचंड भावुक झाला. धर्मेंद्र यांनी केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे तर बिग बॉस सारख्या कार्यक्रमांमध्येही त्यांच्या उपस्थितीने वातावरणात आनंद निर्माण केला. फिनालेच्या अंतिम पर्वात सलमानने त्यांना एक खास श्रद्धांजली वाहिली ज्यामुळे स्टेजवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं.

धर्मेंद्र यांची आठवण काढताना सलमान खान म्हणाला,"मी माझ्या कारकिर्दीत फक्त धर्मजींना फॉलो केले आहे.त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. धरम जी, तुमच्याबद्दल मनात खूप प्रेम आणि आदर आहे, आम्हाला तुमची कायमची आठवण येईल."

English
हिंदी सारांश
Web Title : Dharmendra Honored at 'Bigg Boss 19' Finale; Salman Khan Emotional

Web Summary : The 'Bigg Boss 19' grand finale honored Dharmendra, leaving Salman Khan emotional. Performances by contestants and ex-members added to the atmosphere. Dharmendra, considered like a father to Salman, was remembered for his contributions to Indian cinema. He passed away at 89, leaving fans and the show's participants in mourning.
टॅग्स :बिग बॉस १९सलमान खानधमेंद्र