Too hot!संस्कारी गोपी बहुचा हा हॉट अंदाज,नवीन फोटोशूट केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 14:04 IST
'साथ निभाना साथीयाँ' मालिकेतील गोपी बहु या भूमिकेने घराघरात पोहचलेली देबोलीना भट्टाचार्यासध्या आपले वेगवेगळे हॉट अंदाजातले फोटोशूट करण्यात बिझी ...
Too hot!संस्कारी गोपी बहुचा हा हॉट अंदाज,नवीन फोटोशूट केले शेअर
'साथ निभाना साथीयाँ' मालिकेतील गोपी बहु या भूमिकेने घराघरात पोहचलेली देबोलीना भट्टाचार्यासध्या आपले वेगवेगळे हॉट अंदाजातले फोटोशूट करण्यात बिझी आहे. कारण, मालिका संपल्यानंतर देबोलिनाला हवे तसे मालिकांच्या किंवा भूमिकांच्या ऑफर्स मिळत नसल्यामुळे फोटोशूटमध्येच सध्यात जास्त झळकत आहे. देबोलिनाने आपला लूक चेंज करण्यासाठी खूप फिटनेसवरही मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळते. 'साथ निभाना साथीयाँ' मालिकेत गोपी बहु या सास बहुवर आधारित मालिकेत अगदी ट्रेडिशन अंदाजात देबोलिना पाहायला मिळाली होती.याच मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियताही मिळाली. मालिका बंद झाली आणि आता तिला नवीन हटके भूमिका साकारायची इच्छा असल्याचे तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. नुकतेच देबोलिनाने एक हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधले निवडक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तिला खूप सारे कमेटस आणि लाईक्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.या फोटोशूटसाठी देबोलिनाने ब्लॅक कलरचा डिप नेक टॉप घातल्याचे पाहायला मिळत आहे.तरही काही फोटो तिने पोस्ट केले असून त्यातही ती चांगली गॉर्जिअस दिसत आहे. सध्या मालिकेपेक्षाही वेब सिरीजची धूम पहायाला मिळत असल्यामुळे आता छोट्या पडद्यावरच्या या गोपी बहुला वेब सिरीज करण्याची इच्छा असल्याचे तिने म्हटले आहे. मालिकेतून वेळ मिळाल्यानंतर देबोलिनाने टेली कॅलेंडर-२०१७ साठीही खास फोटोशूट केले होते. त्यावेळीही अतिशय हॉट अंदाजात तिच्या अदा कॅमे-यात कैद झाल्या होत्या.'साथ निभाना साथीयाँ' या मालिकेतील गोपी बहूने अल्पावधीतच रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. गोपी बहु या भूमिकेमुळेच देबोलिना भट्टाचार्जीचे फॅन फॉलोईंगसुद्धा वाढला होता.त्यामुळेच की काय मालिकेच्या एका भागाच्या शूटिंगसाठी देबोलिना 90 हजार ते 1 लाख रुपये इतके मानधन घेत असल्याचेही त्यावेळी चर्चा होत्या. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांना रसिकांनी भरभरून प्रेम दिले.मग कोकीलाबेन असो किंमा मग एहम सगळे कलाकार रसिकांना आपलेसे वाटु लागले. रसिकांच्या पसंतीमुळेच ही मालिका आजही रसिकांची अल्वावधीत फेव्हरेट बनली. त्यामुळेच इतर मालिकांच्या तुलनेत टीआरपी रेटींगमध्येही टॉप 10मध्ये असल्याचे पाहायला मिळाले.'साथ निभाना साथीयाँ' मालिका बंद होऊन 6 महिने झाले असले तरी या मालिकेला रसिक विसरलेले नाहीय.रसिकांच्या प्रेमामुळेच या मालिकेचा दुसरा सिझन येणार असल्याच्याही चर्चा आहेत. Also Read: छोट्या पडद्यावर 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने रचला नवा इतिहास,वाचा सविस्तर