Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची आज आहे शेवटची रात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 12:43 IST

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये बिग बॉस यांनी काल पुष्कर, सई, शर्मिष्ठा या सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची झलक दाखवली

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये बिग बॉस यांनी काल पुष्कर, सई, शर्मिष्ठा या सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची झलक दाखवली. पुष्कर यांनी आपल्या सिनेमामध्ये सुपरहिरोचे काम केले पण तो खऱ्या आयुष्यामध्ये देखील सुपरहिरो आहे हे त्याने त्याच्या बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवासाने सिद्ध केले. प्रत्येकवेळी पुष्कर त्याने त्याचा सर्वोत्तम खेळ खेळला. पण तरीही कॅप्टनसीने तीनवेळा हुलकावणी दिली. पण तरीही तो कधीही न खचला नाही आणि त्याने त्याचा खेळ सुरु ठेवला. मित्रांना, मोठ्यांना, स्त्रियांना आदर दिला, तसेच या घरामधील पुष्करच्या प्रवासातील काही महत्वाच्या गोष्टी देखील त्याच्या AV मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळाल्या. तसेच सईला देखील बिग बॉस मराठीच्या घरातील तिचा प्रवास दाखविण्यात येणार आहे. घरातील मैत्री, अडचणी, मेघा – तिचे नाते, सदस्यांनी तिच्यावर केलेले आरोप. हे सगळ बघून दोघे भाऊक झाले. बिग बॉस यांनी दिलेल्या या खास सरप्राईझ मुळे घरातील सदस्य खूप खुश असून त्यांना आता बिग बॉस जिंकल्यासारखेच वाटत आहे असे त्यांनी बिग बॉस यांना सांगितले. आजच्या भागामध्ये मेघा धाडे, आस्ताद, यांना त्यांच्या घरातील प्रवासाची झलक बघायला मिळणार आहे. 

मेघा आणि आस्ताद दोघांना त्यांचा घरातील प्रवास आज बघायला मिळणार आहे. ते बघितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल ? हे आज प्रेक्षकांना कळेलच. परंतु दोघेही खूप भाऊक होणार हे नक्की. आज विकेंडच्या डावमध्ये महेश मांजरेकर कोणता नवा टास्क देणार ? काय घडणार ?