Join us

रात्रीस खेळ चालेचे टायटल ट्रॅक ऑन पब्लिक डिमांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 16:20 IST

रात्रीस खेळ चाले हि मालिका दिवसेंदिवस खूपच रंजक होत चालली आहे. पण फक्त मालिकाच नव्हे तर मालिकेच्या शीर्षक गीताची ...

रात्रीस खेळ चाले हि मालिका दिवसेंदिवस खूपच रंजक होत चालली आहे. पण फक्त मालिकाच नव्हे तर मालिकेच्या शीर्षक गीताची पण क्रेझ लोकांमध्ये वाढत चालली आहे. या मालिकेचे शीर्षक गीत गायिका सायली पंकज हिने गायले आहे आणि नुकतेच कुडाळमध्ये  सायली एक शो करत असताना प्रेक्षकांनी तिला रात्रीस खेळ चाले चे टायटल ट्रॅक चक्क ३ वेळा गायला लावले. मेलोडीअस आवाज असलेल्या अष्टपैलू गायिका सायलीने 'टिक टिक वाजते', 'जरा जरा दीवानापन', 'प्रेम ऋतू' 'मोहरले हे' यासारखी अनेक लोकप्रिय प्रेमगीते तसेच मँगो डॉली सारखे धमाकेदार डान्स नंबर पण गायला आहे पण पब्लिक डिमांड वर रात्रीस खेळ चालेचे टायटल ट्रॅक तीन वेळा गाण्याचा अनुभव तिच्यासाठी नक्कीच काहीसा वेगळा होता असेल.