Join us
Daily Top 2Weekly Top 5

या मालिकेसाठी शाल्मली खोलगडेने गायले शीर्षक गीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 16:37 IST

गायिका शाल्मली खोलगडेने यावर्षी ’बेबी को बास पसंद है’ या सर्वात मोठ्या हिट गाण्याला सादर केले होते, ज्याने ब-याच ...

गायिका शाल्मली खोलगडेने यावर्षी ’बेबी को बास पसंद है’ या सर्वात मोठ्या हिट गाण्याला सादर केले होते, ज्याने ब-याच काळापर्यंत चार्टवर सर्वोच्च स्थान पटकावले होते. शाल्मलीने विविध भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत मग ती तमिळ असो किंवा तेलगु किंवा तिची मातृभाषा मराठी असो. या वर्षाच्या सुरुवातीला, शाल्मलीने स्त्री सबलीकरणावर गाणे गायले होते, जे अजूनही प्रदर्शित व्हायचे आहे आणि आता तिने मराठी टिव्ही शोसाठी गाणे गायले आहे.’चाहूल’ मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेसाठी शाल्मलीने आपले पहिले सिंगल गाणे देखील गायले आहे, ज्याची रचना तिने स्वत: केली आहे आणि गाण्याच्या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन देखील केले आहे. याव्यतिरिक्त ती एका गाण्याच्या रियॅलिटी शोचे जजही  देखील करणार आहे.ब-याच दिवसांपासून मला मालिकेसाठी शीर्षक गीत गाण्याची इच्छा होती ती आज चाहुलच्या निमित्ताने पूर्ण होतेय. हे गाणे रेकॉर्ड करत असताना मला थोडी भीतीही वाटत होती कारण खूप चढउतार असल्यामुळे कुठेही चुक होवू म्हणून थोडी नर्व्हस होते शेवटी मिळालेली संधीचे सोने करायेच हेच नेहमी डोक्यात होते त्याचप्रमाणे मी ते पूर्ण केले. नक्कीच रसिकांना मालिकेसाठी गायलिले पहिले शीर्षकगीत आवडेल याची खात्री वाटते.