Join us

लव्ह लग्न लोचा या मालिकेचे शीर्षक गीत सुपरहीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 17:51 IST

झी युवावरील लव्ह लग्न लोचा या मालिकेचे शीर्षक गीत नुकतेच डिजीटल माध्यमातून प्रसिध्द झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे तुफान ...

झी युवावरील लव्ह लग्न लोचा या मालिकेचे शीर्षक गीत नुकतेच डिजीटल माध्यमातून प्रसिध्द झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे तुफान गाजत आहे. अवघ्या दोन दिवसांमध्येच तब्बल दोन लाख चाळीस हजार लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. या मालिकेचे संगीत बिपीन जानवलेकर आणि विशाल यांनी केले असून गाण्याचे बोल विशाल यांनीच लिहिले आहेत. विशाल यांनी याआधी युथ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते. हे शीर्षक गीत सक्षम कुलकर्णी जो मालिकेमध्ये (विनय नागपूरकर),ओंकार गोवर्धन (सुमित सरदेसाई), विवेक सांगळे (राघव लव्हेकर), श्रीखर पित्रे झ्र (अभिमान सावंत), सिद्धी कारखानीस (शाल्मली सुर्वे सावंत), रुचिता जाधव (काव्या कामत) आणि समीहा सुळे झ्र (आकांक्षा परब) यांच्यावर चित्रित आहे. शीर्षक गीताच्या शब्द रचनेमध्ये स्वच्छंदपणा, प्रेम, तरुणाईचा बिनधास्त झ्र बेधुंदपणा आहे, तर संगीत बेभान करणारे आहे.