Join us

बन मस्का मालिकेचे शीर्षक गीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:42 IST

झी युवावरील वन मस्का मालिकेचे गीत डिजीटल माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणार असून हे शीर्षक गीत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या संगीताने ...

झी युवावरील वन मस्का मालिकेचे गीत डिजीटल माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणार असून हे शीर्षक गीत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या संगीताने मंत्रमुग्धकरणाºया  केतकी माटेगावकर आणि जसराज जोशी यांनी गायले असून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवलेले महेश लिमये यांनी या गाण्याचे छायाचित्रण केले आहे. हे गाणं बन मस्कामधील शिवानी रांगोळे आणि शिवराज वैचल जे या मालिकेमध्ये मैत्रेयी आणि सौमित्र यांची भूमिका साकारणार आहेत यांच्यावर चित्रित आहे. गाण्याचे शब्द, संगीतरचना, छायाचित्रण, दिग्दर्शन सगळ्यामध्येच नाविन्यता आहे. याआधी मराठी मालिकांचे शीर्षक गीत केतकी माटेगावकर म्हणाली, झी युवाच्या बन मस्का या मालिकेच गाणं खूप आकर्षक तर आहेच, पण आजच्या तरुण पिढीला जे म्हणायचं आहे, त्यांना जे वाटतं याच्याशी खूप साधर्म्य साधणार आहे.