Join us
Daily Top 2Weekly Top 5

या दोन मराठी अभिनेत्रींची नवी इनिंग, अभिनयाव्यतिरिक्त करणार हे काम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 14:47 IST

दोघीही आता बिझनेसवुमन होणार असून लवकरच त्या दोघी मिळून एक कॅफे सुरू करतायेत. खुशबू आणि तितिक्षा यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली त्यांनी चाहत्यांना दिली आहे.

कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणे मराठी अभिनेत्रीदेखील आता अभिनयाव्यतिरिक्त वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. अभिनयासह स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा हा ट्रेंड आता मराठी कलाकरांमध्येही रुढ झाला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वतःचे फॅशन ब्रँड तयार केले. असाच काहीसा अभिनयाशिवाय काही तरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे अभिनेत्री प्रिया मराठेनं. 

प्रिया मराठे हिने मुंबईतील मिरा रोड या ठिकाणी स्वतःचं कॅफे सुरु केले आहे. तसेच प्रिया बेर्डे यांनी ही हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. याच यादीत आता आणखीन दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचेही नाव गणले जाणार आहे.  तितिक्षा आणि खुशबू तावडे या दोन्ही बहिण अभिनय क्षेत्रात काम करत असल्यातरी आता त्यांच्या नवीन इनिंगसाठी त्या सज्ज झाल्या आहेत.

दोघीही आता बिझनेसवुमन होणार असून लवकरच त्या दोघी मिळून एक कॅफे सुरू करतायेत. खुशबू आणि तितिक्षा यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. 'साइड वॉक कॅफे' असे नवीन कॅफेचं नाव असणार आहे.  'सरस्वती' मालिकेतून तितिक्षा तावडेने रसिकांची मनं जिंकली तर खुशबू तावडेनेही विविध मालिका आणि नाटकांतून रसिकांचे मनोरंजन केले आहे.  

टॅग्स :तितिक्षा तावडे