Join us

टीना दत्ताचे लूक्स तुम्हाला करतील घायाळ, तिच्या अदांवर झालेत फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 19:01 IST

टीना दत्ता मालिकांशिवाय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबत चोखेर बाली सिनेमात झळकली होती.

अभिनेत्री टीना दत्ता तिच्या ग्लॅमरस लूकमुळे ती कायम चर्चेत असते. तुर्तास तिचे  सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून  टीना दत्ता नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. 

टीनाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. फॅन्सना स्टायलिश ड्रेसमधला तिचा हा आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.शेअर केलेल्या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे टीनाचे सर्वच फोटो सोशल मीडियावर काहीसे वेगळा ठरतात.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे टीनाचा बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

टीना दत्ता दरम्यानच्या काळात बिग बॉस १३मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तेराव्या सीझनसाठी टीनाला विचारण्यात आलं होतं. पण ते शक्य झालं नाही.'बिग बॉस 14' शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी टीना दत्ताला ऑफर देण्यात आली होती. मात्र नतंर स्वतःने यावर खुलासा केला होता.

दरवर्षी या शोमध्ये सहभागी होण्यासाठी मला विचारणा केली जाते. मात्र या शोमध्ये मला दिले जाणारे मानधन इतरांच्या तुलनेत कमीच असते. त्यामुळे याच कारणामुळे यंदाही मी नकारच दिला. मनासारखे मानधन मिळत नाही तोपर्यंत मी या शोमध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्धारच तिने केला आहे. टीना दत्ता मालिकांशिवाय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबत चोखेर बाली सिनेमात झळकली होती.

टॅग्स :टिना दत्ता