Join us  

बाबो! टिना दत्ताने चक्क भाजीपाल्याच्या ठेल्यावर केलं फोटोशूट; नेटकरी म्हणाले, टोमॅटो कसे दिले?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 6:01 PM

होय, शेअर केलेल्या फोटोत नेहमीप्रमाणे टिना सुंदर दिसतेय. पण या फोटोचे बॅकग्राऊंड पाहून सोशल मीडिया युजर्स हैराण झालेत.

ठळक मुद्देयाआधी एका टॉपलेस फोटोमुळे टिना चांगलीच चर्चेत आली होती. या टॉपलेस फोटो वरून अनेक सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल केले होते.

‘उतरन’ या मालिकेतील इच्छा तुम्हाला आठवत असेलच. होय, अभिनेत्री टिना दत्ताने (Tina Dutta ) ही भूमिका साकारली होती. टिनाची ही भूमिका चांगलीच गाजली होती. या मालिकेनंतर टिनाने अनेक मालिकांत काम केले. पण सध्या टिना मालिकेमुळे कमी अन् सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते. स्वत:चे ग्लॅमरस व बोल्ड फोटो ती शेअर करत असते. याचदरम्यान टिनाने असा काही फोटो शेअर केला की, ती ट्रोल झाली.

होय, शेअर केलेल्या फोटोत नेहमीप्रमाणे टिना सुंदर व ग्लॅमरस दिसतेय. पण या फोटोचे बॅकग्राऊंड पाहून सोशल मीडिया युजर्स हैराण झालेत. ट्रोलिंगसाठी जणू या युजर्सला आयती संधीच मिळाली. मग काय टिना जबरदस्त ट्रोल झाली.  

फोटोत टिना दत्ता भाजी मार्केटमध्ये बसल्याचं दिसून येतंय. तिच्या आजूबाजूला अनेक भाज्या दिसत आहेत. इतकेच नाही तर टिनाच्या समोर देखील एक तराजू दिसतोय. हा फोटो पाहून युजर्सनी टिनाची मजा घ्यायला सुरूवात केली.

 सब्जीवाली बाई आ गई, सब्जी लेलो मोहल्लेवालों, असे म्हणत एका युजरने तिची खिल्ली उडवली.  अन्य एका युजरने ‘मॅडम टोमॅटो कसे दिलेत? असा सवाल करत ट्रोल केले. याआधी एका टॉपलेस फोटोमुळे टिना चांगलीच चर्चेत आली होती. या टॉपलेस फोटो वरून अनेक सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल केले होते. या ट्रोलिंगला कंटाळून टिनाने कमेंट सेशन बंदही केले होते.

टॅग्स :टिना दत्ता