यंदा मराठी चित्रपट 'कान्स फेस्टीव्हल' गाजविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 12:52 IST
संपूर्ण चित्रपटसृष्टीच लध वेधित करणाºया कान्स फेस्टीव्हल यंदा मराठी चित्रपट गाजविणार असे दिसते. कारण कान्स फेस्टीव्हलमध्ये राज्य सरकारच्यावतीने सर्वोत्कृष्ट ...
यंदा मराठी चित्रपट 'कान्स फेस्टीव्हल' गाजविणार
संपूर्ण चित्रपटसृष्टीच लध वेधित करणाºया कान्स फेस्टीव्हल यंदा मराठी चित्रपट गाजविणार असे दिसते. कारण कान्स फेस्टीव्हलमध्ये राज्य सरकारच्यावतीने सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट पाठवण्यात येणार आहे. यासाठी नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, रंगापतंगा, हलाल, कौल, दि सायलेन्स, वक्रतुण्ड महाकाय अशा काही चित्रपटांचे स्क्रीनिंग नुकतेच मुंबईतल्या पु.ल. देशपांडे अकादमीतील मिनी थिएटरमध्ये करण्यात आले आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे, मराठी चित्रपटांचा आशय आणि संहिता जगभरातील चित्रपट प्रेमीपुढे यावे म्हणून हा प्रयत्न होत असल्याचं सांगण्यात आले आहे. ११ ते २२ मे दरम्यान हा कान्स फिल्म फेस्टिव्हल रंगणार असून या कान्स फेस्टिव्हलसाठी कोणत्या अंतिम तीन चित्रपटांची निवड करण्यात येणार आहे याकडे आता सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.