Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाच सर्वसामान्य व्यक्तींची थरारक कहाणी 'हंकार'मध्ये, योगिनी चौक व उज्ज्वल चोप्रा मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 11:20 IST

'हंकार' प्रेक्षकांना मुंबईच्या अधोजगाची एक खिळवून ठेवणारी सफर घडवून आणते. ही मालिका हंगामा प्लेवर उपलब्ध आहे. 

ठळक मुद्देयोगिनी चौक निशाच्या भूमिकेत उज्ज्वल चोप्रा यांनी साकारली अंडरवर्ल्ड डॉन झेडची भूमिका

भारतीय डिजिटल मनोरंजनाच्या क्षेत्रातील अग्रेसर कंपनी हंमागाने आपली दुसरी ओरिजिनल मालिका 'हंकार' वेबदुनियेमध्ये दाखल केली. उत्तम कथासूत्र असलेली ही नाट्यमय मालिका प्रत्येक महानगराच्या अधोजगात घडणाऱ्या काळोख्या कृत्यांवर नजर टाकते आणि या प्रक्रियेत एक असे कथानक उलगडत जाते, ज्यातील प्रत्येक व्यक्ती अजाणतेपणी कुणा दुसऱ्यानेच लिहिलेल्या कहाणीतील प्रमुख पात्र बनून जाते. 'हंकार' प्रेक्षकांना मुंबईच्या अधोजगाची एक खिळवून ठेवणारी सफर घडवून आणते. ही मालिका हंगामा प्लेवर उपलब्ध आहे. 

 'हंकार' या मालिकेतील पाच प्रमुख पात्रांपैकी निशा ही एका वेश्येची मुलगी आहे, जिने बाल व लैंगिक तस्करीला बळी पडणाऱ्या सोडविण्याचा मार्ग स्वीकारला आहे. समाजाच्या वरच्या स्तरामध्ये पोहचण्याच्या धडपडीत प्रदीप या रिअल इस्टेट एजेंटच्या आयुष्याची उलथापालथ झालेली आहे. ड्रग्जचे व्यसन असलेला जेम्स धंद्यात आपला हिस्सा मिळवू पाहत आहे तर चाळीत राहणारा, नीट बोलता न येणारा मंगेश गरीबीतून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. तसेच जॉय हा टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात निष्णात पण स्वभावाने साधाभोळा तरुण सायबर-गुन्हेगारीच्या जगाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आपले नशिब एकमेकांमध्ये गुरफटलेले आहे, या गोष्टीची मात्र या पाचही जणांना अद्याप जाणीव नाही आहे.

हंगामा, पॉकेट फिल्म्स, टॉकॅहोलिक्स प्रोडक्शन्‍स आणि कॅनकॉम यांची निर्मिती असलेल्या या नाट्यमय मालिकेमध्ये नाटक, टीव्ही आणि चित्रपटांतील उत्तमोत्तम अभिनेत्यांची मांदियाळी जमली आहे. 'हंकार'मध्ये उज्ज्वल चोप्रा यांनी अंडरवर्ल्ड डॉन –झेडची भूमिका साकारली आहे. योगिनी चौक हिने निशाची भूमिका केली आहे. राजेश बलवानी याने प्रदीपचे पात्र रंगवले आहे, तर शारदा नंद सिंग जेम्सच्या भूमिकेत दिसणार आहे. मंगेशच्या भूमिकेमध्ये प्रमोद संघी तर जॉयच्या भूमिकेत राममेनन हे कलाकार दिसणार आहेत. उतारवयाकडे पोहोचलेला डॉन मामुजान याचे पात्र शाहनवाज प्रधान साकारणार आहेत. मालिकेचे दिग्दर्शन संजय भाटिया, रवी अय्यर आणि योगी चोप्रा यांनी केले आहे, तर तरुण राजपूत यांनी क्रिएटिव्ह डायरेक्टरची जबाबदारी सांभाळली आहे.