Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या सेटवर तीन वर्षाच्या आर्यनने केले प्रार्थना बेहरेला प्रपोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 11:53 IST

झी युवाववरील डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या व्यासपीठावर सध्या अनेक सिनेकलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळत ...

झी युवाववरील डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या व्यासपीठावर सध्या अनेक सिनेकलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे त्यांच्या ​What’s up लग्नचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. या भागात डान्स महाराष्ट्र डान्स या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या तीन वर्षाच्या आर्यनने सगळ्याचे मन जिंकले. या कार्यक्रमाचा निवेदक नेहमीप्रमाणे जेव्हा प्रार्थना बेहरे बरोबर त्याच्या स्टाईल मध्ये फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा ३ वर्षाचा आर्यन व्यासपीठावर 'एक मिनिट एक मिनिट' करत आला आणि तडक मोर्चा प्रार्थना बेहरेकडेच वळवला. प्रार्थना बेहरेला भेटल्यावर त्याने चक्क "कुछ कुछ होता है प्रार्थना, तुम नही समजोगी' असा फिल्मी डायलॉगच मारला आणि परीक्षक, प्रेक्षक यांनी मनसोक्त हशा आणि टाळ्यांनी दाद दिली. एवढे करून हा पठ्ठा थांबला नाही तर "आपके पैर जमीन पे मत रखिये, वरना मैले हो जायेंगे," "एक बार जो मैने कमिटमेंट करली, तो मैं खुदकी भी नही सुनता" असे अनेक डायलॉग मारले आणि मजा म्हणजे हे सगळे डायलॉग त्याने त्याच्या बोबड्या आवाजात म्हटले. त्याला बघून प्रार्थना म्हणाली " तुझं मी काय करू ...चाऊ का? " हे ऐकून तर एकच हशा पिकला. निवेदक सुव्रत जोशीने त्याची ओळख करून देताना सांगितले की, हा बच्चू तीन वर्षांचा आहे आणि सेटवर आतापर्यंत तीन वेळा आला आहे आणि त्याच्या तीन नायिकांसोबत होणारी सेटिंग तोडून गेला आहे." यावर तर सगळ्यांनी मजा घेतली. प्रार्थना बेहरेने अनाऊन्स केले की आर्यन हा माझ्या पुढच्या सिनेमाचा हिरो असेल. डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमातील स्पर्धकांना कोणत्याही डान्स प्रकारचे कसलेही बंधन नाहीये. यात एखादा डान्सर सोलो किंवा ग्रुपमध्ये, मुख्य म्हणजे विविध नृत्यशैली लोकांसमोर आणू शकतो. आजपर्यंत कोणत्याही वाहिनीने या प्रकारचा खुला मंच डान्सरसाठी उपलब्ध करून दिला नाही आणि हेच डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाचे वेगळेपण आहे.Also Read : वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांचा ​What’s up लग्न हा चित्रपट प्रदर्शित होणार १६ मार्चला