Join us

तीन महिन्यातच गाशा गुंडाळला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 12:34 IST

रिश्तो का सौदागर - बाजीगर ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेद्वारे वत्सल सेठने छोट्या ...

रिश्तो का सौदागर - बाजीगर ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेद्वारे वत्सल सेठने छोट्या पडद्यावर कित्येक महिन्यांनंतर कमबॅक केला असल्याने प्रेक्षकांना या मालिकेकडून चांगल्याच अपेक्षा होत्या. तसेच या मालिकेच्या निर्मात्यांनी वत्सल आणि इशिता दत्ता या प्रमुख कलाकारांसोबत नॉन डेटिंगचा करार केला होता. या करारानुसार कार्यक्रम सुरू असताना ते दोघे एकमेकांसोबत नात्यात अडकू शकणार नाहीत. या करारामुळे मालिकेची चांगलीच चर्चा झाली होती. पण मालिका सुरू झाल्यापासूनच टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेला टिकता आले नाही. आता ही मालिका पुढील महिन्यात संपणार असल्याची चर्चा सुरू आहे.