Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्या आठवणीने भावुक आणि तितकीच आनंदित झाली अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी,काय होतं कारण जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 11:34 IST

छोट्या पडद्यावर सध्या विविध रिअॅयिटी शोची धूम पाहायला मिळते आहे.या शोच्या माध्यमातून उद्योन्मुख स्पर्धकांना त्यांच्या कला दाखवण्याची उत्तम संधी ...

छोट्या पडद्यावर सध्या विविध रिअॅयिटी शोची धूम पाहायला मिळते आहे.या शोच्या माध्यमातून उद्योन्मुख स्पर्धकांना त्यांच्या कला दाखवण्याची उत्तम संधी मिळत आहे.शिवाय दिग्गज कलाकारांचं मार्गदर्शनही या स्पर्धकांना लाभतं आहे.छोट्या पडद्यावरील असाच एक मराठमोळा डान्स रिअॅलिटी शो 'डान्स महाराष्ट्र डान्स'सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.अभिनेता सिद्धार्थ जाधव, कोरियोग्राफर फुलवा खामकर आणि दिग्दर्शक आदित्य सरपोतदार या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत पाहायला मिळतात. दर आठवड्याला या डान्स रिअॅलिटी शोमध्ये विविध सेलिब्रिटी उपस्थिती राहून आपल्या आगामी सिनेमाचं प्रमोशन करत असतात.गेल्या आठवड्यात स्वप्नील जोशी, गणेश आचार्य यांनी या शोमध्ये उपस्थिती लावली होती. या आठवड्यात अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या डान्सच्या मंचावर पाहुणी म्हणून अवतरली आहे. सोनालीची या शोमध्ये उपस्थिती स्पर्धकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. तिच्याकडून डान्सच्या टीप्स घेण्याची संधीही या स्पर्धकांना लाभली. सोनालीच्या उपस्थितीमुळे या डान्स रियालिटी शोमध्ये विविध गोष्टींचा उलगडासुद्धा होणार आहे. या शोमध्ये पाहुणी म्हणून उपस्थित राहिलेली सोनाली एका कारणामुळे भावुक झाल्याचेही पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये उपस्थित राहिल्याने तिला तिच्या लाडक्या हिरोला भेटण्याची आणि त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी लाभली.अभिनेता सिद्धार्थ जाधव हा सोनाली कुलकर्णीचा आवडता अभिनेता आहे.कोणत्याही कलाकारासाठी त्याचा पहिला सिनेमा हा त्याच्यासाठी पहिलं प्रेम असतं.त्यातील सहकलाकारांसोबत त्यांचं विशेष नातं असतं.असंच काहीसं नातं सोनाली आणि सिद्धार्थचंही आहे.सोनाली आणि सिद्धार्थ यांनी दहा वर्षांपूर्वी 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. सोनाली कुलकर्णीने या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. या सिनेमात सिद्धार्थसह तिची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.मात्र यानंतर दोघं एकत्र स्क्रीनवर झळकले नाही.मात्र तब्बल दहा वर्षानंतर या डान्स रियालिटी शोच्या निमित्ताने सिद्धार्थसह एकत्र येण्याचा योग जुळून आल्याने सोनाली भलतीच खुश आणि तितकीच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. सिद्धार्थला भेटून आणि एकत्र स्क्रीन शेअर करुन आनंद झाल्याची भावना तिने व्यक्त केली.या डान्स रिअॅलिटी शोच्या या भागात सिद्धार्थ आणि सोनालीने बरीच धम्माल केली.