Join us

मृत्यूच्या दाढेतून परत आली 'ही' मराठमोळी अभिनेत्री, आता कमबॅकसाठी झालीय सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 20:01 IST

मराठमोळी ही अभिनेत्री प्रबळ इच्छाशक्ती आणि जगण्याच्या उमेदीमुळे गंभीर दुखापतीतून बाहेर पडली आहे. इतकेच नाही तर कमबॅकसाठीही सज्ज झाली आहे.

अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा ५ महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. अपघातामध्ये त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. याशिवाय मणक्याला देखील मार लागला होता. त्यामुळे वर्षा दांदळे यांना हालचाल देखील करणे अशक्य झाले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा अवस्थेत रुग्णांची वाचण्याची शक्यता खूप कमी असते. काही जण कोमात जातात तर काही जण जगाचा निरोप घेतात. मात्र वर्षा दांदळे यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि जगण्याच्या उमेदीमुळे या गंभीर दुखापतीतून बाहेर पडल्या आहेत. इतकेच नाही तर त्या कमबॅकसाठी सज्ज झाल्या आहेत.

वर्षा दांदळे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करण्यास सुरुवात केली होती. यामुळे त्यांना चालताही येऊ लागले होते. आता या दुखापतीतून पूर्णपणे बऱ्या होऊन वर्षा दांदळे पुन्हा एकदा पुनरागमन करताना दिसत आहेत.

निसर्ग फिल्म प्रस्तुत ‘रानजाई’ या चित्रपटात त्या काम करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे. दिग्दर्शक राजन बने रानजाई या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 

वर्षा दांदळे या बृहन्मुंबई महानगरपालिकेत संगीत शिक्षिकेची नोकरी करत असत. इथूनच त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती. झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेत त्यांनी काम केले. यात त्यांनी साकारलेली वच्छी आत्याची भूमिका खूपच गाजली होती. पुढे नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत लता काकू, घाडगे आणि सूनमधील सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ आणि मालवणी डेज मधली मालवणी काकू, पाहिले न मी तुला मधील उषा मावशी अशा अनेक भूमिका त्यांनी केल्या आहेत.