Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मन उडू उडू झालं'मधील दिपूच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीला केलं होतं रिजेक्ट, हृता दुर्गुळेची केली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:38 IST

'मन उडू उडू झालं' ही मालिका लोकप्रिय ठरताना दिसत आहे. दिपूची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने साकारली आहे.

झी मराठीवर 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Jhala) ही मालिका लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला इंद्रा आणि दिपू यांची जोडी पाहायला मिळाली आहे. ही जोडी अतिशय लोकप्रिय ठरली आहे. दिपूची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने साकारली आहे. तर इंद्राची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊतने निभावली आहे. नुकतीच एक माहिती समोर आली आहे. दिपूच्या भूमिकेसाठी हृताची निवड होण्याआधी मराठी टेलिव्हिजनवरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं ऑडिशन दिलं होतं. मात्र तिला रिजेक्ट करण्यात आलं. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीनेच केला आहे.  

'मन उडू उडू झालं' या मालिकेत दिपूच्या मोठी बहिण शलाकाची भूमिका अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी हिने साकारली आहे. शलाका कुलकर्णीने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान एक मोठा खुलासा केला आहे. या खुलासमध्ये तिने मालिकेतील तिच्या भूमिकेबाबत माहिती दिली आहे. यावर बोलताना तिने सांगितले की, सगळ्यात आधी दिपूच्या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिली होती. मला ही भूमिका करायची होती. मात्र, या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली नाही. त्यामुळे ही मालिका न करण्याचा निर्णय घेतला होता, तर तिची या मालिकेसाठी मोठ्या बहिणीसाठी निवड करण्यात आली होती.

तिने पुढे सांगितले की, बराच विचार केल्यानंतर तिने ही मालिका करण्यास होकार दिला. या मालिकेमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. अरुण नलावडे, अजिंक्य राऊत, हृता दुर्गुळे हे आपल्याला या मालिकेत दिसत आहेत.

या मालिकेचे दिग्दर्शन मंदार देवस्थळी यांनी केले आहे. त्यामुळे तिने ही मालिका नंतर स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आणि तिची भूमिका देखील आता हिट ठरली आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळे