तिसऱ्याचा सबंधच नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 16:33 IST
विविअन डिसेना आणि वाहबिझ दोराबजीची पहिली भेट प्यार की यह एक कहानी या मालिकेच्या सेटवर झाली होती. या भेटीचे ...
तिसऱ्याचा सबंधच नाही...
विविअन डिसेना आणि वाहबिझ दोराबजीची पहिली भेट प्यार की यह एक कहानी या मालिकेच्या सेटवर झाली होती. या भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते दोघे घटस्फोट घेणार असल्याची काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती. यांच्या घटस्फोटासाठी अभिनेता विपुल रॉय जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. पण या केवळ सगळ्या अफवा असल्याचे वाहबिझने म्हटले आहे. ती सांगते, "आमच्या घटस्फोटासाठी कोणतीही तिसरी व्यक्ती जबाबदार नाहीये. विपुल हा माझा केवळ मित्र आहे. त्यामुळे अशा चुकीच्या बातम्या पसरवणे बंद करावे." तर विपुल सांगतो, "वाहबिझ आणि विविअन या दोघांचे कुटुंब मला खूपच जवळचे आहे. त्या दोघांनी पुन्हा एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे."