Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीची लोकप्रिय हिंदी मालिकेत एन्ट्री, 'गंगा माई की बेटियां'मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 13:27 IST

'गंगा माई की बेटियां' या मालिकेतून ती हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहे. या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता प्रधान हिने हिंदी टेलिव्हिजनविश्वात पदार्पण केलं आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या नम्रताची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. 'गंगा माई की बेटियां' या मालिकेतून ती हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहे. या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

'गंगा माई की बेटियां' मालिकेतून अभिनेत्री सृष्टी जैनने एक्झिट घेतली. त्यानंतर आता तिचं पात्र नम्रता प्रधान साकारणार आहे. 'गंगा माई की बेटियां' मध्ये नम्रता सहानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबद्दल नम्रता म्हणाली, "गंगा माई की बेटियां' मधून हिंदी मालिकाविश्वात पदार्पण करताना मला खूप आनंद झाला. मराठी इंडस्ट्रीमध्ये माझ्या कामावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आणि आता हा नवा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. 'सहाना' ही भूमिका साकारण्याची संधी मिळणं माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि या व्यक्तिरेखेला प्रामाणिकपणे आणि मनापासून साकारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी मला या नव्या भूमिकेतही तितकंच प्रेम आणि पाठिंबा द्यावा, अशी मनापासून इच्छा आहे". 


'गंगा माई की बेटियां' मालिकेच्या शूटिंगसाठी नम्रता चंदिगडला जाणार आहे. 'छत्रीवाली' या मालिकेत नम्रता दिसली होती. पण 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेने नम्रताला लोकप्रियता मिळवून दिली. ‘मिसेस देशमुख’ या सिनेमातही नम्रताने काम केलं आहे. आता 'गंगा माई की बेटियां' या हिंदी मालिकेत तिला पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Thipkyanchi Rangoli' fame Namrata Pradhan enters Hindi series 'Ganga Mai Ki Betiyan'

Web Summary : Namrata Pradhan, known for 'Thipkyanchi Rangoli,' debuts in Hindi TV with 'Ganga Mai Ki Betiyan,' replacing Srishti Jain. She plays Sahana, expressing joy and seeking audience support for this new journey.
टॅग्स :टिव्ही कलाकार