Join us

शशांक केतकरच्या नव्या मालिकेत झळकणाऱ्या या दोन अभिनेत्री आहेत तरी कोण?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:24 IST

शशांक केतकर (Shashank Ketkar)ची नवीन मालिका 'मुरांबा' (Muramba Serial) १४ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

​येत्या १४ फेब्रुवारी पासून स्टार प्रवाह वाहिनीवर मुरांबा (Muramba Serial) ही नवीन मालिका दाखल होणार आहे. शशांक केतकर (Shashank Ketkar) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मुरांबा ही मालिका ट्रायअँगल लव्ह स्टोरी असणार आहे. मालिकेचा नायक रेवाच्या प्रेमात असतो मात्र रेवाची मैत्रीण रमा ही नायकाच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळते. नायकाच्या आगमनाने रेवा आणि रमा यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण करणार का हे मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शशांक केतकर सोबत या मालिकेत दोन मुख्य​​ नायिका झळकणार आहेत. शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) हिने या मालिकेत रमाची तर निशानी बोरूले (Nishani Borule)ने रेवाची भूमिका निभावली आहे.

शिवानी मुंढेकर ही मूळची कराडची आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकत असताना विविध सांस्कृतिक कार्यक्रमात ती नेहमी सहभागी व्हायची. नृत्याची देखील तिला विशेष आवड आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज तिने पोस्ट केले आहेत. यातूनच तिला प्रसिद्धी मिळाली. मुरांबा ही तिची पहिली मालिका आहे. त्यामुळे शिवानीसाठी ही मालिका खूप खास ठरणार आहे.​ 

तर निशानी बोरूले हिने ‘हिरकणी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय थंडा बुखार या हिंदी भाषिक म्युझिक व्हिडीओ अल्बममध्ये ती झळकली आहे. एक दाक्षिणात्य जाहिरातीत देखील निशानीने काम केले आहे.

मुरांबा ही निशानीची पहिलीच मराठी मालिका असणार आहे. या मालिकेआधी अंजन टीव्ही वरील ‘चुलबुली चाची’ या हिंदी मालिकेत तिने महत्वाची भूमिका साकारली होती.​ 

टॅग्स :शशांक केतकरस्टार प्रवाह