Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG!! लॉकडाऊन उठल्यानंतरही टीव्हीवर परतणार नाहीत प्रेक्षकांच्या आवडत्या या तीन मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 16:57 IST

लॉकडाऊन इफेक्ट

ठळक मुद्देबेहद 2 या मालिकेत जेनिफर विंगेट, शिवीन नारंग, आशीष चौधरी मुख्य भूमिकेत होते. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दूभाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्व टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सीरिज यासारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे चित्रीकरण बंद आहे. टीव्ही मालिकांचे शूटींग बंद झाल्याने सर्व वाहिन्यांनी आपल्या जुन्या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा धडाका चालवला आहे. अशात आता एक शॉकिंग बातमी आहे. तीन मालिका कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होय, बेहद 2, इशारों इशारों में आणि पटियाला बेब्स या मालिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहे. याचाच अर्थ लॉकडाऊननंतरही या मालिका टीव्हीवर परतणार नाहीत.

संबंधित वाहिन्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या तिन्ही मालिका फिक्शन शो आहेत. याचे स्वरूप आणि या मालिकांच्या कथेची गती ही काळानुरूप आहे. मार्चपासून शूटींग बंद आहे. आपण सध्या ज्या आणीबाणीच्या स्थितीत आहोत, त्या स्थितीत या मालिकांचा तार्किक शेवट शूट करणे शक्य नाही. या तिन्ही मालिका एका रोचक टप्प्यावर होत्या. पण निर्मात्यांशी चर्चा केल्यानंतर या मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे संबंधित वाहिनीने स्पष्ट केले.

पटियाला बेब्स’चे निर्माता रजिता शर्माने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमच्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण लॉकडाऊनमध्ये आम्ही नव्या भागांचे शूटींग बंद आहे. आता कधी शूटींग सुरु होईल,हेही माहित नाही. त्यामुळे सर्वांच्या हितासाठी सर्वसहमतीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.बेहद 2 या मालिकेत जेनिफर विंगेट, शिवीन नारंग, आशीष चौधरी मुख्य भूमिकेत होते. तर पटियाला बेब्समध्ये अनशूर कौर, सौरभ राज जैन, परिधी शर्मा, अनिरूद्ध दवे मध्यवर्ती भूमिकेत होते.

टॅग्स :पटियाला बेब्स