Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्टार प्रवाह'च्या 'विठूमाऊली'मध्ये उलगडणार या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 11:29 IST

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की, बच्चेकंपनीची धमाल-मस्तीही सुरू होते. वेगवेगळे प्लॅन्स आखले जातात. या सुट्टीत मुलांसाठी स्टार प्रवाह ही ...

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की, बच्चेकंपनीची धमाल-मस्तीही सुरू होते. वेगवेगळे प्लॅन्स आखले जातात. या सुट्टीत मुलांसाठी स्टार प्रवाह ही वाहिनी एक अनोखी पर्वणी घेऊन आली आहे. स्टार प्रवाहच्या विठूमाऊली मालिकेतून पुंडलिकाच्या भक्तीचा महिमा उलगडला जातोय. दिवेश मेडगे यात पुंडलिकाच्या भूमिकेत आहे.पुंडलिक आणि विठ्ठल यांच्यातले नाते अतिशय जवळचे आहे. अगदी विठ्ठलाच्या आरतीमध्ये 'पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा' असा उल्लेखही आढळतो. पुंडलिक त्याच्या लहानपणापासूनच विठ्ठलाचा भक्त होता. पुढे त्या दोघांमध्ये भक्त आणि देव एवढेच नाते राहिले नाही. तर विठ्ठल पुंडलिकासाठी चक्क कमरेवर हात घेऊन विटेवर वाट बघत उभा राहिला. हा सगळा प्रवास आता 'विठूमाऊली'मध्ये पाहायला मिळणार आहे. भक्तिभावाने ओथंबलेले असे हे भाग असणार आहेत. भक्तासाठी देव विटेवर उभा राहिल्याची ही अनोखी गोष्ट आहे. पुंडलिकाच्या भूमिकेविषयी दिवेश मेडगे फारच उत्सुक आहे. सुट्टी सत्कारणी लागत असल्याची भावना त्याने यावेळी व्यक्त केली. शिवाय सेट वर बरीच बच्चेकंपनी असल्यामुळे शूटिंग मधल्या फावल्या वेळेत बरीच धमाल येते. त्यामुळे विठूमाऊलीच्या सेटवरचे हे क्षण दिवेशसाठी खूप मोलाचे असल्याचे तो सांगतो.महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाचं तिन्हीसांजेला दर्शन घडवणारी 'विठूमाऊली' ही स्टार प्रवाहची मालिका महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाली आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, गावांपासून शहरांपर्यंत सगळेच विठ्ठलभक्त 'विठूमाऊली' मालिकेमुळे विठूनामाचा गजर करत तल्लीन होत आहेत.लोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहीत नसलेली विठ्ठलाची कहाणी या पौराणिक मालिकेतून सादर करण्यात आली आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिका उलगडत आहे. त्याशिवाय पंढरपूर क्षेत्राची निर्मिती, विठ्ठल पालखी सोहळा, विठ्ठलाचा मुकूट आणि आभूषणे यांच्याही रंजक कथा या मालिकेतून पाहायला मिळत आहेत. उत्तम निर्मितीमूल्य, कसलेले कलाकार आणि अभ्यासू लेखनामुळे या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 'विठूमाऊली' साकारणाऱ्या अजिंक्य राऊतला अनेक प्रेक्षकांनी फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे मेसेज करून मालिका आवडत असल्याचे कळवले आहे.Also Read : उर्मिलाला आता मी जितका वेळ देईल, तितका तो कमीच ः आदिनाथ कोठारे