Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून उर्वशी ढोलकियाच्या नवीन लूकची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 12:20 IST

'कसौटी जिंदगी की' मालिकेतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालताना दिसत ...

'कसौटी जिंदगी की' मालिकेतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. उर्वशीची भूमिका असलेली चंद्रकांता ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजत आहेत.'कसौटी जिंदगी की' या मालिकेत उर्वशीने कोमोलिका ही भूमिका साकारली होती. या भूमिकेला निगेटिव्ह शेड्स होत्या. विशेष म्हणजे उर्वशीच्या या मालिकेतील अभिनयासह तिची स्टाईलसुद्धा प्रसिद्ध झाली होती. कोमोलिका लूक रसिकांना चांगलाच भावला होता. महिलांमध्ये तर कोमोलिकाची फॅशन जणू काही ट्रेंडची बनली होती.तिच्या साडीपासून मेकअप सगळ्याच गोष्टी महिला आणि तरुणी फॉलो करत होत्या. आता पुन्हा एकदा उर्वशीच्या स्टाईलचा जलवा चंद्रकांता मालिकेच्या निमित्ताने रसिकांना पाहायला मिळत आहे. नुकतंच या मालिकेतील उर्वशीचा नवा लूक समोर आला आहे. या लूकमधील उर्वशीचं सौंदर्य आणि स्टाईल रसिकांना घायाळ करत आहे.डोक्यावर मुकुट, आकर्षक आय लायनर आणि तितकाच आकर्षक असा काळ्या-जांभळ्या रंगातील ड्रेसमध्ये उर्वशीचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचं पाहायला मिळतंय.'चंद्रकांता' या मालिकेतील तिचा हा लूक आहे. या मालिकेत उर्वशी राणी इरावती ही भूमिका साकारत आहे. कोमोलिकाप्रमाणेच उर्वशी साकारत असलेल्या राणी इरावतीच्या भूमिकेलाही निगेटिव्ह शेड्स आहेत. यांत उर्वशीने कपटी अशा राणीची भूमिका साकारली आहे. उर्वशी साकारत असलेली ही राणी इरावती चालाख आणि सत्तेची भुकेली आहे.या भूमिकेला साजेशा लूक मालिकेच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतो. आकर्षक ड्रेसिंग स्टाईल असली तरी तिची नजर कपटी असल्याचं या लूकमध्ये पाहायला मिळतंय.तिच्या मनात जणू काही तरी नवा कट शिजत असल्याचं या फोटोकडे पाहून समजतंय. त्यामुळेच उर्वशीचा हा नवा लूक सध्या रसिकांना चांगलाच भावतो आहे. सोशल मीडियावरही तिच्या या लूकला रसिकांची पसंती मिळत आहे. अशा निगेटिव्ह शेड्स असलेल्या भूमिका साकारण्यात काहीही वावगं नसल्याचं खुद्द उर्वशीने सांगितले आहे. अशा भूमिकांमुळे रसिकांच्या मनात माझ्याविषयी तिरस्कार, राग निर्माण होत असेल तर ती आपल्या कामाची पोचपावती आहे असं उर्वशीला वाटतं.