Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक दीवाना था या मालिकेची टीम या कारणाने अडकली मनालीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 12:34 IST

एक दीवाना था ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

एक दीवाना था ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच मनाली येथे करण्यात आले. त्यावेळी या मालिकेच्या टीमला एका वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले. नमिक पॉल, डॉनल बिष्ट, विक्रम सिंह चौहान आणि निर्माता प्रतीक शर्मा यांच्यासह ‘एक दीवाना था’ची संपूर्ण टीम मनालीमध्ये चार दिवसांच्या आऊटडोर शेड्यूलसाठी गेले होते. मनालीमध्ये चित्रीकरण करण्यास सगळीच टीम खूप उत्सुक होती. पण मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिमवृष्टीमुळे ते तब्बल पाच तास तेथील एका गावात अडकले होते.शिव (नमिक), शरण्या (डॉनल) आणि व्योम (विक्रम) यांना त्रास देणे सुरूच ठेवतो आणि नमिक बर्फाखाली गाडला जातो अशा दृश्याचे चित्रीकरण केले जात होते. सारे काही सुरळीत सुरू होते. नमिक या दृश्याचे चित्रीकरण करत होता. पण सकाळी मालिकेच्या टीमला कळले की, नमिकचा बॉडी डबल येऊ शकणार नाहीये. त्यामुळे त्याला बर्फाखाली जवळ जवळ अर्धा तास झोपून राहावे लागणार होते. यात एका पोकळ लाकडी काठीच्या मदतीने नमिकला श्वास घ्यावा लागणार होता. या दृश्याचे चित्रीकरण मनालीपासून ५०-६० किमी लांब हातिम पासला सुरू होते. चित्रीकरण देखील खूप चांगल्या प्रकारे पार पडले. पण चित्रीकरण करून परतताना अचानक खूप बर्फ पडू लागला आणि सगळ्यांना अर्ध्या रस्त्यातच थांबावे लागले. याविषयी या मालिकेचे निर्माते प्रतीक शर्मा सांगतात, आम्ही कोणालाही फोन करू शकत नव्हतो, कोणापर्यंत पोहोचू शकत नव्हतो. मोबाइलला नेटवर्कच नव्हते. बर्फवृष्टी होतच राहिली. त्यामुळे परिस्थिती संपूर्ण हाताबाहेर गेली. सुदैवाने गावातल्या काही लोकांनी आम्हाला पाहिले आणि वेळेवर ते आमच्या मदतीस धावून आले. बर्फवृष्टी थांबेपर्यंत त्यांनी आम्हाला ब्लॅंकेट दिले. तसेच खायला देखील दिले. नंतर आम्ही त्या लोकांच्या मदतीने रस्त्यावरील बर्फ हटवला आणि पुन्हा परतीच्या रस्त्याला लागलो. आम्ही खूपच हळूहळू गाडी चालवत असल्याने आम्हाला हॉटेलवर पोहोचायला खूप उशीर झाला. गावातल्या लोकांच्या आतिथ्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.Also Read : एक दीवाना था या मालिकेच्या टीमला मनालीत आला हा वेगळा अनुभव