पोस्टर आहे पण नाव नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 12:20 IST
हल्ली मराठी इंडस्ट्रीला झाले काय सोशलमिडीयाचा फायदा साधत कोणते ही अपकमिंग प्रोजेक्ट असो त्याचे पोस्टर प्रदर्शित करायचे किवा एखादी ...
पोस्टर आहे पण नाव नाही
हल्ली मराठी इंडस्ट्रीला झाले काय सोशलमिडीयाचा फायदा साधत कोणते ही अपकमिंग प्रोजेक्ट असो त्याचे पोस्टर प्रदर्शित करायचे किवा एखादी कॅ च लाइन टाकायची आणि ते नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार असे सांगायचे. नुकतेच राधा ही बावरी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला सौरभ तर होणार सून मी या घरची या मालिकेतून महाराष्ट्राची लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान या दोघांनी ही सोशलमिडीयावर एक पोस्ट अपलोड केली आहे.यामध्ये तोजश्रीने फक्त एक पोस्टर अपडेट केले आहे आणि कमिंग सून टाकले आहे. तर सौरभने कट, सीन, टेक करत माय न्यू मुव्ही असे अपडेट केले आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सने तेजश्री प्रधानशी संवाद साधला असता ती म्हणाली, येस...आता फक्त पोस्टर अपडेट केले आहे. पण ते नाटक, मालिका, चित्रपट यापैकी किवा यापेक्षा ही काही वेगळ असू शकत.यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा दिवस वाट पाहावी लागणार.त्याचे नावासहित सगळचं काही गुलदस्त्यात आहे. पण तिने अपडेट केलेले पोस्टर पाहता एखादी लव्हस्टोरी पाहायला मिळेल असे वाटते नक्की. }}}}