Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कोई लौट के आया है या मालिकेत शोएब इब्राहिमने साकारला डरमधला सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 14:11 IST

चित्रपटातील दृश्य मालिकांमध्ये तसेच्या तसे पुन्हा चित्रीत करणे हे काही नवीन नाही. डर या चित्रपटातील दृश्य नुकतेच कौई लौट ...

चित्रपटातील दृश्य मालिकांमध्ये तसेच्या तसे पुन्हा चित्रीत करणे हे काही नवीन नाही. डर या चित्रपटातील दृश्य नुकतेच कौई लौट के आया है या मालिकेत चित्रीत करण्यात आले. डर या चित्रपटात शाहरुख खान, जुही चावला आणि सनी देओल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. किरणच्या प्रेमात वेडा झालेला राहुल रंगपंचमीच्या दिवशी किरणच्या घरात घुसतो आणि तिला रंग लावतो हा प्रसंग चांगलाच गाजला होता. या दृश्याप्रमाणेच एक दृश्य नुकतेच कोई लौट के आया है या मालिकेत चित्रीत करण्यात आले. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे शोएब इब्राहिम आणि सुरभी ज्योती यांच्यावर हे दृश्य चित्रीत करण्यात आले. शोएब इब्राहिमने हे दृश्य जसेच्या तसे मालिकेत उभे केले. शोएब हा शाहरुखचा चाहता असल्याने हे दृश्य चित्रीत करण्यासाठी तो खूप उत्सुक होता. शोएबदेखील चेहऱ्याला रंग लावून त्याच्या प्रेयसीच्या घरात शिरला ज्याच्यामुळे त्याला कोणीच ओळखले नाही. तो घरात जाऊन त्याच्या प्रेयसीसमोर म्हणजेच सुरभी ज्योतीसमोर जाऊन उभा राहिला. त्याला पाहून तिला चांगलाच धक्का बसला. पण तोच अभिमन्यू आहे हे कळायच्या आतच तो गायब झाला. डर चित्रपटातील ते भीतीदायक दृश्य चांगलेच गाजले होते. इब्राहिमनेदेखील या दृश्याला योग्य न्याय दिला. डरमधील सीन परत करायला मिळाल्यामुळे शोएब खूप खूश झाला होता. तो सांगतो, "हे दृश्य मी अगदी शाहरुखने डरमध्ये दिलेल्या दृश्याप्रमाणेच दिले. शाहरुख हा माझा आवडता नट असल्याने मला त्याच्यामुळेच चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. हा सीन लोकांना आवडेल अशी मला आशा आहे."