Join us

"समाजात खरेखुरे हिरोतर दिग्विजयसारखेच असतात...", मिलिंद गवळींची जावयाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 10:00 IST

Milind Gawali: मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर त्यांचा जावई दिग्विजयसोबतच्या क्षणांचा व्हिडीओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मिलिंद गवळी (Milind Gawali) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमात विविधांगी भूमिका साकारली आहे. अलिकडेच त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेत साकारलेली अनिरुद्धची भूमिका खूपच गाजली. ही मालिका बंद झाली असली तरी या मालिकेने आणि त्यातील पात्रांनी रसिकांच्या मनात घर केलंय. या मालिकेनंतर मिलिंद गवळींच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झालीय. ते आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावरून संवाद साधत असतात. नुकतेच त्यांनी त्यांच्या जावईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. 

मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर त्यांचा जावई दिग्विजयसोबतच्या क्षणांचा व्हिडीओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, ''दिग्विजय म्हणजेच माझा दिगूबाबा. १८ जून २०२५ त्याचा वाढदिवस. आणि तो आमच्या सगळ्यांचा खास असल्यामुळे त्याच्यासाठी संस्कृतमधून शुभेच्छा. ( सुदिनम् सुदिना जन्मदिनम् तव। भवतुर्मंगलं जन्मदिनमू।। चिरंज़ौव कुरु कीर्तिवर्धनम्| चिरंजीव कुरु पुण्यावर्थनम्[। विज़यी भवतु सर्वत्र सर्वदा। जगति भवतु तव सुयशगानम्।। )  जगातल्या कुठल्याही दुसऱ्या भाषेत शब्दच अपुरे पडले असते. दिगू बाबा फक्त माझं जावई आहे म्हणून तो खास नाहीये, तर माणूस म्हणून पण तो खूपच खास आहे. आयुष्य कसं जगायचं असतं हे मी दिग्विजय कडून शिकलो, त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जगावेगळा आहे.''

त्यांनी पुढे म्हटले की, ''आयुष्याच्या प्रवासामध्ये कितीही अडचणी आल्या तरी चेहऱ्यावरचं हसू तो कधीही जाऊ द्यायचं नाही, हे मी त्याच्याकडूनच शिकलो, त्याचा मिश्किल स्वभाव हा सगळ्यांनाच आनंद देऊन जात असतो, दिगू बाबा ज्यांना कोणाला भेटतो त्या सगळ्यांना असंख्य आनंदाच्या मेमरीज देऊनच परत पाठवतो. त्याच्या सानिध्यामध्ये मी जितका हसतो तितका मी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये हसत नाही, कुणाच्याही कार्यक्रमात जर दिगू बाबा हजर राहायला तर त्या कार्यक्रमाला चारचाँद लागतात. त्याचबरोबर एखादं काम हातात घेतलं तर ते १००% पूर्ण आत्मीयतेने आणि जबाबदारीने पूर्ण करायचं, ते तडीस न्यायचं, पूर्ण जबाबदारी घेणे, आणि काम यशस्वीरित्या पूर्ण करणे. हे तू सतत करत असतो. ''

''दिसायला तो राजबिंडा आहेच, त्याच्याकडे बघून मला...''

''दिसायला तो राजबिंडा आहेच, त्याच्याकडे बघून मला नेहमी असं वाटतं की माझ्या या कलाक्षेत्रामध्ये हिरो म्हणून त्यानेच असायला हवं होतं, इतका देखणा, इतकं छान व्यक्तिमत्व जे सिनेमाच्या कॅमेरामध्ये टिपायला हवं पण तो सिरम घ्या रिसर्च लॅब्रटोरीमध्ये १२-१४ वर्षापासून पडद्याआड आहे. पण माझी कलाक्षेत्रातली पडद्यावरची ही दुनिया खोटीखोटी आहे, पडद्यावरचे हिरो खोटे असतात, आपल्या समाजामध्ये खरेखुरे हिरो तर दिग्विजय सारखेच असतात, तो फक्त दिसायला हिरो नाहीये तर तासन् तास महिनोंमहिने वर्षांनूवर्ष भारतातल्या अफ्रीकेतल्या अनेक देशातल्या गरीब लेकरांसाठी कमी दरात लसी तयार करण्याचं काम करतात. भारतापेक्षा अनेक देश इतके प्रगतीशील असून सुद्धा कोविड व्हॅक्सिन  दिग्विजयच्या सिरम कंपनीनेच तयार केलं, आणि जगाला दिलं. आणि अनेकांचे जीव वाचवले. खरे हिरो तर हेच आहेत. मला दिग्विजयचा अभिमान वाटतो. त्याचं काम किती बोरिंग, तेचतेच आणि नॉन ग्लॅमरस आहे, तरीसुद्धा आज १४ वर्षे सातत्याने करत राहणं यालाच हिरोजम म्हणतात. वाढदिवसाच्या निमित्ताने दिग्विजय च्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप आशीर्वाद म्हणून खूप खूप शुभेच्छा'', अशा छान शब्दांत मिलिंद गवळींनी आपल्या लाडक्या जावयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिका