Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस-10' मध्ये यांची नावं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 16:50 IST

'बिग बॉस'च्या 10 सीझनची रसिकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. त्यातच या शोमध्ये सामान्यांना एंट्री मिळणार असल्यानं हा शो कसा असेल, ...

'बिग बॉस'च्या 10 सीझनची रसिकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. त्यातच या शोमध्ये सामान्यांना एंट्री मिळणार असल्यानं हा शो कसा असेल, स्पर्धक कोण असतील याबाबतच्या चर्चांनाही उधाण आलंय. यातील स्पर्धकांमध्ये सगळ्यात आघाडीवर नाव आहे ते पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच हिचं. गेल्या काही महिन्यांपूर्वी टी-20 वर्ल्ड कप दरम्यान ही मॉडेल चर्चेत आली होती. शाहिद आफ्रिदीच्या पाकिस्तानी टीमनं भारतीय टीमला पराभूत केल्यास न्यूड होणार असल्याचं तिनं जाहीर केलं होतं. मात्र तसं काही घडलं नाही. त्यावेळी तिनं आफ्रिदी आणि टीमच्या नावाने खडे फोडल्याचाही व्हिडीओ समोर आला होता. स्वतःला एक्सपोझ करणारी ही मॉडेल बिग बॉसमध्ये एंट्री मारणार असल्याचं बोललं जातंय.याशिवाय अभिनेता गोविंदाच्या थप्पडमुळं चर्चेत आलेला संतोष बटेश्वर आणि एमटीव्ही रोडिज-एक्स-4चा विजेता बलराज सिंग खेरा हासुद्धा या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळं बिग बॉसच्या आगामी सीझनचं जोरदार काऊंडडाऊन सुरु झालंय. पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचरोडिज-एक्स-4चा विजेता बलराज सिंग खेरागोविंदाच्या थप्पडमुळं चर्चेत आलेला संतोष बटेश्वर