Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अबोली' मालिकेत सुयश टिळकने साकारलेल्या विविधांगी भूमिकांचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 18:37 IST

Suyash Tilak : 'अबोली' मालिकेत सुयश टिळक साकारत असलेल्या भूमिकेचे सध्या कौतुक होते आहे. मालिकेत त्याने आतापर्यंत एक दोन नाही तर तब्बल १५ वेगवेगळी पात्र साकारली आहेत.

अबोली (Aboli) मालिकेत सुयश टिळक (Suyash Tilak) साकारत असलेल्या भूमिकेचे सध्या कौतुक होते आहे. मालिकेत त्याने आतापर्यंत एक दोन नाही तर तब्बल १५ वेगवेगळी पात्र साकारली आहेत. कधी तो कडक लक्ष्मीच्या रुपात समोर येतो, तर कधी वृद्धाच्या रुपात. कधी तो रिक्षाचालक असतो तर कधी विदुषक. कधी तो दशावतारी रावण असतो तर कधी पोस्टमन. सुयशने मालिकेत परिचारिका, लमाणी स्त्री, जादुगार अशी वेगवेगळी पात्र देखील साकारली आहेत. भूमिका एक आणि त्याच्या छटा अनेक असा प्रयोग मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच होतोय.

अबोली मालिकेतल्या या बहुरुपी पात्राविषयी सांगताना सुयश म्हणाला, ‘ही भूमिका साकारताना मी खऱ्या अर्थाने समृद्ध होतोय. एकाच मालिकेत मी आतापर्यंत १५ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक पात्र वेगळं आहे. ते समजून घेत त्याप्रमाणे व्यक्त होणं ही वेगळी कसोटी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक पात्रासाठी तयार होताना मी आणि अबोली मालिकेची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते. 

आमचे मेकअपमन शैलेश पाठारे आणि त्यांची संपूर्ण टीम माझ्या लूकवर विशेष मेहनत घेतात. त्यामुळेच मी साकारलेलं प्रत्येक पात्र वेगळं दिसतं. अबोली मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे आणि यापुढेही मिळत राहील याची खात्री आहे. तेव्हा न चुकता पहा अबोली रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर, असे सुयश म्हणाला.

टॅग्स :सुयश टिळक