Join us
Daily Top 2Weekly Top 5

शितली आणि इंद्रा या फ्रेश जोडीचा ऑनस्क्रीन रोमान्स, गाण्याला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 14:32 IST

या नव्या कोऱ्या जोडीचा ऑनस्क्रीन रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. या गाण्याचा व्हिडीओ अगदी चित्रपट चित्रित करावा तशा पद्धतीने चित्रित केला गेला आहे.

मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zal) फेम इंद्रा अर्थात इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊत. होय, शिवानी बावकर यांचं ‘नाते नव्याने’ हे गाणं रिलीज झालं आहे. या नव्या कोऱ्या जोडीचा ऑनस्क्रीन रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. . या गाण्याचा व्हिडीओ अगदी चित्रपट चित्रित करावा तशा पद्धतीने चित्रित केला गेला असून तो अत्यंत देखणा झाला आहे.

हे गाणे एका प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. ही प्रेमकथा आहे मायरा आणि जय यांच्यातील. काहीशी गुंतागुंतीची आणि काहीशी गोंधळाच्या परिस्थितीतील ही प्रेमकथा आहे. यातील प्रेमाच्या भावना या नितळ आहेत, पण नायक मात्र नायिकेसमोर त्या मांडायला कचरतो आहे. या गोष्टी स्पष्टपणे समोर येतात आणि त्यामुळे मग गाण्याच्या मुख्य व्हिडीओबद्दलची उत्सुकता अधिक ताणली जाते.

सध्या झी मराठीवर ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका तुफान लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील इंद्रा आणि दीपूची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडत आहे. या मालिकेत इंद्राची भूमिका साकारुन अभिनेता अजिंक्य राऊत प्रचंड चर्चेत आला आहे.

शिवानी बावकर बद्दल सांगायचं तर ‘लागीरं झालं जी’ या मालिकेनंतर ती ‘कुसूम’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. या मालिकेने देखील काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर शिवानी बावकर रुपेरी पडद्यावर झळकली. ‘गुल्हर’ या मराठी चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती.

 

टॅग्स :शिवानी बावकर