Join us

'फुलाला सुगंध मातीचा'मधील अभिनेत्रीची झालीय भयंकर अवस्था; फोटो पाहून चाहतेही पडलेत चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 16:04 IST

Phulala Sugandh Maticha:'फुलाला सुगंध मातीचा'मधील अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

छोट्या पडद्यावरील मालिका फुलाला सुगंध मातीचा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील मधुरा जोशी हिने या मालिकेत इमलीची भूमिका साकारली आहे. मधुरा जोशी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.दरम्यान मधुराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतील तिची अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. 

चित्रपट किंवा मालिकांमधील कथानकानुसार कलाकारांना त्यांच्या लूक आणि कॅरेक्टरमध्ये बदल करावा लागतो. मात्र, आता मधुराचा सोशल मीडियावरील एक फोटो पाहून चाहते गोंधळात पडले आहेत. त्यांना हा फोटो पाहून मधुराची तब्येत ठीक नाही का, असा प्रश्न पडला आहे. तर काहींना तिने हे तिच्या कोणत्या भूमिकेसाठी हा लूक केला असेल, असे वाटत आहे. 

मधुरा जोशी मराठी सोबत हिंदी मालिकांमध्ये देखील काम करत आहे. सध्या ती हिंदी मालिका पुण्यश्लोक आहिल्यामध्ये काम करते आहे. या मालिकेसाठी तिने आपला लूक बदलला आहे.

पुण्यश्लोक अहिल्या या हिंदी मालिकेमध्ये मधुरा जोशी हिने रेणू ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने चक्क टक्कल केले आहे. सोशल मीडियावर तिचा हा फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी तिला काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. मात्र, असे काही नसून या मालिकेसाठी तिने आपले केस काढून टक्कल केले आहे, तर काही जणांनी मधुराचे या धाडसासाठी कौतूक देखील केले आहे.