Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसुंधरा-बनीच्या नात्यात येणार दुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 13:59 IST

Punha Kartavya Aahe Serial : 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत आकाश आणि वसूची कथा रेखाटण्यात आली आहे.

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत आकाश आणि वसूची कथा रेखाटण्यात आली आहे. आता या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. बनी हॉस्टेलमध्ये गेल्यामुळे आता वसुंधरा आणि त्याच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

बनीच बोर्डिंग स्कुलमध्ये अॅडमिशन होतं आणि परतीच्या प्रवासाला निघालेल्या वसुंधराचा होस्टेल मधून पाय निघत नाही. बनीच्या मनाची देखील घालमेल होतेय तो वसुंधरा समोर रडू शकत नाहीये. मात्र वसुंधरा तिथून गेल्यानंतर बनी ढसाढसा रडायला लागतो. तर इथे जयश्री पाय दुखण्याचे खोटं खोटं नाटक करतेय. वॉर्डन बनीची सगळ्यांसोबत ओळख करून देते आणि पूर्ण दिवसाचे रुटीन समजावते. हॉस्टेलमध्ये दोन विद्यार्थी मोहित आणि प्रणित बनीला घाबरवण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळे बनीसाठी नवीन असल्यामुळे बनीला वसुंधराची खूप आठवण येते. 

वसुंधरा उपाशी असल्यामुळे आकाश तिला बाहेर जेवायला घेऊन जातो. तिकडे आकाशची भेट लकीशी होते. आकाशने बिझनेस एक्सपांड करावा म्हणून सगळं काही गहाण ठेवून लोन घेतले आहे. भास्कर ह्या विचाराच्या विरोधात आहे आणि घरामध्ये पहिल्यांदा भास्कर आणि आकाशमध्ये भांडण होतं. वसु आणि अवनी भावांच्या भांडणात पडायचं नाही असं ठरवतात. इथे बनीने केलेला फोन वसुंधरा उचलते मात्र तिला बनी सोबत बोलता येत नाही त्यामुळे बनीचा गैरसमज होतो की वसुंधरा त्याच्या शिवाय ठाकूरांच्या घरी खुश आहे. बनी आणि वसुंधराच्या नात्यात खरंच दुरावा निर्माण होईल? लकी आणि वसुंधरा एकमेकांच्या समोर येतील ? हे पाहण्यासाठी मालिका पाहावी लागेल.

टॅग्स :झी मराठी