Join us

'बिग बॉस १८'च्या ट्रॉफीची पहिली झलक आली समोर, विजेत्याला मिळणार इतकी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:18 IST

Bigg Boss 18 : बिग बॉस १८चा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. सलमान खानच्या या सर्वात वादग्रस्त शोच्या ग्रँड फिनालेसाठी फक्त पाच दिवस बाकी आहेत.

बिग बॉस १८ (Bigg Boss 18)चा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. सलमान खानच्या या सर्वात वादग्रस्त शोच्या ग्रँड फिनालेसाठी फक्त पाच दिवस बाकी आहेत. १९ जानेवारीला बिग बॉस १८च्या विजेत्याच्या नावाची घोषणा होणार आहे. सध्या करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, विवियन डिसेना, ईशा सिंग, चुम, शिल्पा शिरोडकर आणि रजत दलाल या शोमध्ये ट्रॉफीसाठी झगडत आहेत. यासह निर्मात्यांनी सीझन १८चीट्रॉफी आणि ग्रँड फिनालेची वेळ देखील उघड केली आहे.

बिग बॉस १८ च्या निर्मात्यांनी विजेत्याला देण्यात येणाऱ्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवली आहे. सीझन १७ पेक्षा यावेळी ट्रॉफी मोठी आणि सुंदर दिसत आहे. सीझन १८ची ट्रॉफी अधिक उठावदार दिसते आहे. ज्यावर दोन मोठे बी चिन्हे बनवले आहेत आणि त्याच्या खाली विनर बिग बॉस १८ असे लिहिले आहे. या ट्रॉफीसाठी कोण पात्र आहे हे महाअंतिम फेरीतच कळेल. सध्या, चाहते बिग बॉस १८ च्या विजेत्याच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या दिवशी रंगणार ग्रॅण्ड फिनाले?बिग बॉस १८च्या ग्रँड फिनालेसाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो जारी केला आहे आणि शोच्या ग्रँड फिनालेची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. रिलीज केलेल्या प्रोमोनुसार, बिग बॉस १८चा शेवटचा भाग १९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता प्रसारित केला जाईल. यावेळी सलमान खान कोणत्या स्पर्धकाची निवड करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळेल?बिग बॉस १८च्या विजेत्याला ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम आणि ट्रॉफी मिळणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात ७ स्पर्धक आहेत. फिनालेआधी, कोणत्या दोन स्पर्धकांचा प्रवास संपणार आणि टॉप ५ मध्ये कोण पोहोचणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

टॅग्स :बिग बॉस