Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात है..! 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटूने खरेदी केली पहिली कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 16:21 IST

मालिकेत अन्विता (Anvita Phaltankar)ने साकारलेली स्वीटूच्या भूमिकाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Me Nandayla) मालिकेत रोज नवे टि्वस्ट आणि टर्नस येतात. मालिकेत अन्विता (Anvita Phaltankar)ने साकारलेली स्वीटूच्या भूमिकाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज अन्विताचा खूप मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. 

अन्विताने नुकतीच नवी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या गाडीचा फोटो शेअर केला आहे. 'फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल' असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिलं आहे. यावरुन लक्षात येतं, की ही अन्विताचा खरेदी केलेली पहिली कार आहे. अन्विताला चाहत्यांसोबतच सर्व सेलिब्रेटी शुभेच्छा देत आहेत. 

स्वीटूने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान 'रुमी'च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे.मात्र, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या माध्यमातून ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.

टॅग्स :झी मराठीटिव्ही कलाकार