Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत गश्मीर महाजनीसोबत दिसणार ही प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 13:14 IST

डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा डान्स रिएलिटी शो २७ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

डान्स महाराष्ट्र डान्स  (Dance Maharashtra Dance Lil Masters) लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर २७ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमासाठी चिंचि चेटकीण महाराष्ट्रातून काही खास लिटिल मास्टर्स शोधून काढतेय. नुकतंच प्रेक्षकांना कळलं की या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत गश्मीर महाजनी दिसणार आहे. पण त्याच्या जोडीला अजून एक हरहुन्नरी अभिनेत्री परीक्षकाची भूमिका निभावणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni). 

संपूर्ण महाराष्ट्राला सोनाली कुलकर्णीच उत्तम नृत्यकौशल्य नवीन नाही. सोनाली कुलकर्णी ही परीक्षकाच्या भूमिकेसाठी योग्य आहे यात काही वादच नाही. या कार्यक्रमातील आपल्या परीक्षकाच्या भूमिकेबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली, "डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाच्या परीक्षकाची भूमिका निभावण्याची जबाबदारी मला मिळाली आहे याचा मला आनंद आहे. झी मराठी आणि डान्स रिऍलिटी शो सोबत माझं नातं खूप आधीपासून आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक डान्स रिएलिटी शो तो पण झी मराठीवर करताना मला खूप आनंद होतोय. त्याचसोबत या कार्यक्रमात लहान स्पर्धक असणार आहेत त्यामुळे मी खूप उत्सुक आहे.

ती पुढे म्हणाली की, आताची पिढी ही खूपच जास्त टॅलेंटेड अहे. त्यामुळे त्यांचं परीक्षण करणं हे आम्हाला सोपं जाईल असं मला अजिबात वाटत नाही. हा कार्यक्रम खूपच रंजक असणार आहे कारण याचा फॉरमॅट देखील थोडा वेगळा आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी