Join us

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून 'हा' प्रसिद्ध कलाकार पडणार बाहेर, स्वतःच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 15:32 IST

Satvya Mulichi Satavi Mulagi : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका रंजक वळणावर आली आहे.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulagi) मालिका रंजक वळणावर आली आहे. नुकतेच मालिकेत नेत्राला प्रसूतीकळा सुरु होतात. अद्वैत रुपालीला हॉस्पिटलमध्ये नेत असताना अनेक अडचणी येतात. त्याचवेळी नेत्राचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरच्या रुपात त्रिनयना देवी येते. नेत्रा २ बाळांची आई होते आणि नंतर नेत्रा विरोचकाचा वध  करते. मालिकेत विरोचकाचा वध झाल्यानंतर रुपाली या भूमिकेची एक्झिट होणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अखेर या चर्चेवर रुपालीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मौन सोडले आहे. 

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत विरोचकाचा मृत्यू होणार आहे, मग रुपाली या पात्राची मालिकेतून एक्झिट होणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. दरम्यान ऐश्वर्या नारकर यांनी अल्ट्रा मराठी बझला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, रुपाली या पात्राची एक्झिट होणार आहे. त्यानंतर मालिकेत परत रुपाली पात्र पाहायला मिळणार नाही. पण मालिकेतील आगामी कथानक खूपच रंजक असणार आहे. नेत्राच्या गर्भात विरोचकाचा अंश आहे. त्यामुळे विरोचक अमर राहणार आहे. पण या सीक्वन्सनंतर रुपालीची मालिकेतून एक्झिट कन्फर्म आहे.

ऐश्वर्या नारकर पुढे म्हणाल्या की, मालिकेतील माझी भूमिका चांगली होती. पण कोणतीही भूमिका संपते तेव्हा वाईट तर वाटतेच. माझ्यासाठी हा भावुक क्षण असतो. कारण ती भूमिका आपण काही काळ जगत असतो. त्यामुळे हा प्रवास जेव्हा शेवटच्या टप्प्यात येतो, तेव्हा खूप त्रास होतो. त्यातही या मालिकेची गोष्टच वेगळी होती. त्यात काम करताना मला खूप मजा आली आणि आम्ही सेटवर ऑफस्क्रीनसुद्धा खूप धमाल केली. आम्ही रील्स बनवायचो. ही सगळी मजा मी खूप मिस करणार आहे.