Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माणसाच्या राक्षशी प्रवृत्तीचा...", सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना उषा नाडकर्णी झाल्या भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:10 IST

अभिनेत्री उषा नाडकर्णी (usha nadkarni) नेहमीच त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात.

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी (usha nadkarni) नेहमीच त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. उषा नाडकर्णी आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी पवित्र रिश्ता मालिकेत आई मुलाची भूमिका साकारली होती. त्यांच्यात खूप चांगलं नातं होतं. दरम्यान लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी सुशांत सिंग राजपूतवर बोलल्या. यावेळी बोलताना त्या भावुक झाल्या होत्या.

अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुशांत सिंग राजपूतच्या निधनावर आपलं मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, वाईट वाटत गं खूप. माणसाच्या राक्षशी प्रवृत्तीचा मला राग येतो. माझं कसं आहे माहिती ना तू मला नाही आवडली ना मी तुझ्याकडे बघतंच नाही पण तू जर माझ्याकडे बोलायला आली तर मी मूक भाषेमध्ये खुणेने बोलते. मी तुला मारून टाकायचं हे कधी डोक्यात येणारंच नाही. 

त्या पुढे म्हणाल्या की, त्याला खूप वाईट पद्धतीने मारलंय. गळ्याला बेल्ट वगैरे लावून. डोळा बघितला ना त्याचा कसा झाला होता तो. नाही का हलकट माणसं... पण ही माणसं भोगणार... मी असेन नसेन मला माहित नाही पण ही माणसं भोगणार आणि देव ज्याचं त्याला देतो. वेळ लागतो कधी कधी मिळायला पण मिळतं आणि त्यांना त्या ह्याच्यात जाताना आठवतं मी हे केलेलं म्हणून हे झालं.

वर्कफ्रंटउषा नाडकर्णी अलिकडेच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या रिएलिटी शोमध्ये दिसल्या होत्या. तसेच त्या बिग बॉस मराठी सीझन २ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. झी मराठीवरील खुलता कळी खुलेना मालिकेतील त्यांची भूमिका खूप गाजली होती. तसेच आजही त्या पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांचे सुशांत सिंग राजपूतसोबतचे बॉण्डिंग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. याशिवाय त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टॅग्स :उषा नाडकर्णीसुशांत सिंग रजपूत