Join us

'कौन बनेगा करोडपती'मध्ये १ कोटी जिंकणारा चिमुकला आज आहे IPS अधिकारी, आता ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:02 IST

Kaun Banega Crorepati : २००१ साली १४ वर्षांचा एक मुलगा सहभागी झाला होता. त्याने 'कौन बनेगा करोडपती' ज्युनिअरमध्ये १ कोटी रुपये जिंकले होते. आज हा चिमुकला आयपीएस अधिकारी आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati). हा शो गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी म्हणजेच २००१ साली १४ वर्षांचा एक मुलगा सहभागी झाला होता. त्याने कौन बनेगा करोडपती ज्युनिअरमध्ये १ कोटी रुपये जिंकले होते. हा चिमुकला म्हणजे रवि मोहन सैनी. रवी मोहन सैनी (Ravi Mohan Saini) आज आयपीएस अधिकारी आहेत.

२००१ मध्ये प्रसिद्धीझोतात आलेले रवी मोहन सैनी लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. केबीसी ज्युनियर जिंकताना ते १०वी इयत्तेत होते. १२ वी नंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर रवी त्याच क्षेत्रात पुढे गेले नाही. एमबीबीएस नंतर त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांनी त्यासाठी कोणतेही कोचिंग घेतले नाही. 

सैनी यांचे वडील होते नौदल अधिकारी

रवी मोहन सैनी यांचे वडील नौदल अधिकारी होते. रवी मोहन यांनी २०१२ मध्ये पहिल्यांदाच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दिली. पण नंतर ते मेन्स परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. २०१३ मध्ये, त्यांची भारतीय टपाल विभागाच्या अकाउंट्स अँड फायनान्स सर्व्हिसेससाठी निवड झाली. २०१४ मध्ये, त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया ४६१ व्या क्रमांकासह आयपीएस झाले. २०२१ मध्ये, त्यांना गुजरातमधील राजकोट शहरातील डीसीपी-झोन १ चे एसपी बनवण्यात आले. 

सर्व १५ प्रश्नांची दिली अचूक उत्तरं

रवी मोहन सैनी हे राजस्थानमधील अलवर येथील रहिवासी आहेत. त्यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील नेव्हल पब्लिक स्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. २००१ मध्ये, दहावीत त्यांनी बॉलिवूडचे दिग्गज अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या केबीसी ज्युनियरमध्ये भाग घेतला. सर्व १५ प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याबद्दल सैनी यांना १ कोटी रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की अमिताभ बच्चन यांना भेटण्याच्या त्यांच्या इच्छेने त्यांना शोमध्ये नशीब आजमावण्यासाठी प्रेरित केले.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन