Join us

Exclusive: 'रंग माझा वेगळा'मधील 'हे' पात्र येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत येणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 19:05 IST

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिकेने मराठी मालिकांच्या टीआरपीच्या रेसमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे कार्तिकी, दीपिका आणि सौंदर्या कार्तिक आणि दीपाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे श्वेताचे कारस्थान काही थांबायचे नाव घेत नाही. दरम्यान आता या मालिकेत एक पात्र पुन्हा पाहायला मिळणार आहे. कोणते पात्र असेल हे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर दीपाची मैत्रिण अश्विनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

रंग माझा वेगळा मालिकेत दीपा जिच्या घरात राहते आहे ती तिची मैत्रिण अश्विनी नवऱ्याला भेटण्यासाठी दुबईत जाते असे दाखवले होते. त्यानंतर अश्विनी दुबईवरून परत आलेली दाखवली नाही. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता पुन्हा मालिकेत अश्विनीची एन्ट्री होणार आहे. खरेतर दीपाची मैत्रीण साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी घाटे हिने ब्रेक घेतल्याचे समोर आले आहे. तिची तब्येत बिघडल्यामुळे ती काही दिवस मालिकेत दिसणार नाही. त्यामुळे निर्मात्यांनी अश्विनी या पात्राची रिएन्ट्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मालिकेत अश्विनीची भूमिका अभिनेत्री वैशाली राहुल भोसले (Vaishali Rahul Bhosale) हिने साकारली होती. मध्यंतरी तिने ही मालिका सोडल्याचे वृत्त समोर आले होते. ती प्रेग्नेंट राहिल्यामुळे तिला ही मालिका सोडावी लागली होती. त्यानंतर काही दिवसांनी मिसकॅरेज झाल्याचे तिने सांगितले होते. मात्र आता अश्विनीची भूमिका कोण साकारणार आहे आणि तिची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह