Join us

"सगळ्यांबरोबर जे ऋणानुबंध जुळले आहेत ते...", 'कॉन्स्टेबल मंजू'ला निरोप देताना अभिनेत्री भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 11:53 IST

Kalyani Sonawane : अभिनेत्री कल्याणी सोनावणेने इंस्टाग्रामवर 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेच्या सेटवरील विविध क्षणांचा व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.

सन मराठी वाहिनीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेतील आत्या म्हणजेच अभिनेत्री कल्याणी सोनावणे(Kalyani Sonawane)ने सोशल मीडियावर मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री कल्याणी सोनावणेने इंस्टाग्रामवर 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेच्या सेटवरील विविध क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले की, मी एकूण सहा सिरीयल केल्या पण लागिर झालं जीनंतर खूप मनापासून अटॅचमेंट झाली असेल ती कॉन्स्टेबल मंजूच्या कलाकार आणि युनिट सोबत. खूप हसलो, खूप भांडलो, खूप चिडलो, रागवलो, सगळं केलं एकमेकांसोबत, काम सुद्धा तितक्याच ताकतीने केलं आणि म्हणून आपली कॉन्स्टेबल मंजू मालिका शेवटपर्यंत नंबर वन राहिली. भांडलो रागावलो तरी ते सगळं अगदी हक्काने होतं. माझे सगळे लाड आणि हट्ट सुरजने पुरवले. माझ्या अडचणीत तो नेहमी माझ्या सोबत राहिला. खूप मदत केली आणि खूप समजून सुधा घेतलं मला. माझ्या चुका पोटात घातल्या. सगळं सगळं कधीही न विसरता येणारं आहे. 

तिने पुढे म्हटलं की, मालिका संपली म्हणून काय झालं पण आपल्या सगळ्यांबरोबर जे ऋणानुबंध जुळले आहेत ते कधीच संपणार नाहीत. एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहूया. काम करत असताना माझ्याकडून कोणाला काही मनाला लागेल असे बोलले गेले असेल किंवा वागले गेले असेल तर सर्वांची मनापासून माफी मागते आणि सर्वांचे खूप खूप आभार की मला आपल्या या फॅमिली मध्ये सामावून घेतलं. एकस्मै प्रोडक्शन चे खूप खूप आभार. लव्ह यू ऑल. सगळ्यांची खूप आठवण येईल. 'कॉन्स्टेबल मंजू' टीमला खूप प्रेम आणि पाठिंबा व सहकार्यासाठी सगळ्यांचे खूप आभार.