Join us

घराघरातील लाडकी पारू झाली महाराष्ट्राची लाडकी मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:41 IST

Paaru Serial : 'पारू' मालिकेत दररोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतेच या मालिकेने १ वर्ष पूर्ण केलंय.

'पारू' मालिकेत (Paaru Serial) दररोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतेच या मालिकेने १ वर्ष पूर्ण केलंय, यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं आणि सेलिब्रेशनचं अजून एक कारण होत ते म्हणजे घराघरातील आपली लाडकी पारू होणार आहे महाराष्ट्राची लाडकी मॉडेल. हो हे खरं आहे पारू पुन्हा एकदा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबेसेडर होणार आहे.

पारू धाडसाने अनुष्काला सामोरे जाऊन ठामपणे घोषित करते की, "पंधरा दिवसांच्या आत मी तुला किर्लोस्कर घरातून बाहेर फेकून देईन!" यामुळे दोघींच्या शत्रुत्वाला आणखी धार येणार आहे आणि पारू थेट अनुष्काला आव्हान देते. इकडे दिशा किर्लोस्कर उद्योग समूहाविरुद्ध प्रतिस्पर्धी कंपनी सुरू करते, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा धोका निर्माण होतो. अहिल्या चिंतेत आणि विचारात आहे की, आदित्य या कठीण स्पर्धेला कसा सामोरा जाईल. 

अनुष्का पारू आणि आदित्यच्या नात्यातली माहिती गोळा करू लागते, पारूविरुद्ध काहीतरी सबळ पुरावा मिळवण्याचा प्रयत्न करते. पारू मात्र अनुष्काला तिच्याच पद्धतीने उत्तर देते. तिच्या निर्भीड आणि बिनधास्त स्वभावाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तिचा हा नवा अवतार तिच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरतो. पारुला पुन्हा एकदा दिमाखात किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबेसिडर बनवण्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन केले गेले. अनुष्काचा खरा चेहेरा आता पारू सर्वांसमोर आणणार आहे. अनुष्काचा खरा चेहेरा समोर आल्याने पारु आणि अनुष्कामध्ये अस्तित्वाची लढाई सुरू झालीय. दिशा जेलच्या बाहेर आल्याने तिने अहिल्या किर्लोस्करला आव्हान दिले आहे. आता या पोस्टर लाँच कार्यक्रमात दिशा आणि अनुष्काच नातं सगळ्यांसमोर येईल? दिशा ने किर्लोस्कर कुटुंब संपवण्याचा रचलेला डाव यशस्वी होईल? या समारंभात दिशा ने ठेवलेला बॉम्ब पारु आणि आदित्य करतील का डीफ्युज की ह्या सगळ्यात जाईल कोणाचा जीव  या सगळ्याच्या उत्तरांसाठी पारू मालिका पाहावी लागेल.

टॅग्स :झी मराठी