Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत होणार या अभिनेत्रीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 18:33 IST

Sundara Manamadhye Bharli : 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत मिसेस नाशिक म्हणजे कामिनीच्या भूमिकेत नवीन अभिनेत्री पाहायला मिळणार आहे.

सुंदरा मनामध्ये भरली (Sundara Manamadhye Bharli ) ही मालिका आता लवकरच संपणार की काय अशी चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे या मालिकेतून अनेक कलाकारांनी काढता पाय घेतला आहे. तब्बल चार ते पाच कलाकारांनी या मालिकेतून निरोप घेतला आहे. नुकतेच या मालिकेत मिसेस नाशिक म्हणजे कामिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा पुरंदरे ही देखील मालिका सोडून गेली आहे. तिचे मालिका सोडण्याचे कारण वेगळे असल्याचे सांगण्यात येते. मात्र, याआधी अनेकांनी ही मालिका सोडलेली आहे. त्यामुळे या मालिकेच्या यशाबाबत शंका निर्माण होत आहे. या मालिकेमध्ये अभ्या आणि लतिका यांची कहाणी दाखवण्यात आलेली आहेत. मात्र आता या मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये आपल्याला अभ्याच्या भूमिका समीर परांजपेने साकारली आहे, तर लतिकाच्या भूमिकेत अक्षया नाईक पाहायला मिळते आहे. अतिशा नाईक यांनी देखील या मालिकेत चांगले काम केले आहे. बापूच्या भूमिकेत आपल्याला उमेश दामले दिसत आहेत. दरम्यान आता काही दिवसांपूर्वी पूजा पुरंदरे हिने मालिका सोडली होती. तिने या मालिकेमध्ये कामिनी तसेच मिसेस नाशिक ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तिने मालिका सोडल्यामुळे अनेक प्रेक्षक देखील नाराज झाले होते. त्यामुळे आता ती जागा भरण्यासाठी या मालिकेच्या निर्मात्यांनी एका अभिनेत्रीने या मालिकेत घेतले आहे.

मिसेस नाशिक म्हणजे कामिनीची भूमिका या मालिकेमध्ये अभिनेत्री श्वेता नाईक करणार आहे. श्वेता नाईक अतिशय जबरदस्त अभिनेत्री आहे. याआधी तिने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. क्रिमिनल चाहूल गुन्हेगारीची या क्राईम सीरिजमध्ये ती दिसली होती.