Join us

'सुंदरा मनामध्ये भरली'मधून बाहेर पडलेल्या या अभिनेत्रीचं मालिकेत कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 12:11 IST

Sundara Manamadhye Bharli: गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल चार कलाकारांनी ही मालिका सोडली होती. मात्र आता या चार जणांपैकी एका अभिनेत्री मालिकेत कमबॅक केल्याचे समजते आहे.

छोट्या पडद्यावर सध्या सुंदरा मनामध्ये भरली (Sundara Manamadhye Bharli) ही मालिका चांगलीच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अभ्या आणि लतिका यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. इतर पात्रांनी देखील रसिकांच्या मनात घर केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल चार कलाकारांनी ही मालिका सोडली होती. मात्र आता या चार जणांपैकी एका अभिनेत्री मालिकेत कमबॅक केल्याचे समजते आहे. 

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल चार कलाकारांनी मालिका सोडल्याचे समोर आले होते. दौलतच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते धनंजय वाबळे यांनी देखील ही मालिका सोडली होती. त्याचप्रमाणे प्रणिती नरके हिने देखील ही मालिका सोडली होती. प्रणिती नरके हिने मालिकेमध्ये हेमाची भूमिका साकारली होती. तिच्या चेहऱ्याला इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे तिने ही मालिका स्वतःहून सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिची इतर कोणतीही समस्या नव्हती. आता तिच्या चेहऱ्याची अॅलर्जी बरी होत आहे.

आता या मालिकेमध्ये सोडून गेलेल्या कलाकारांपैकी अभिनेत्री प्रणिती नरके ही पुन्हा एका मालिकेत आली आहे. तिने या मालिकेत हेमाची भूमिका साकारली आहे. आता तिच्या चेहऱ्याला झालेले इन्फेक्शन हे कमी झालेले आहे. त्यामुळे आता ती मालिकेत पुन्हा एकदा दिसणार आहे. या मालिकेचा नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला प्रणिती नरके म्हणजेच हेमाही दिसत आहे. त्यामुळे लवकरच तिची मालिकेत एंट्री होणार आहे.

टॅग्स :कलर्स मराठी