Join us

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील अभिनेत्रीची झाली सर्जरी, रुग्णालयातील फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 17:09 IST

Mazi Tuzi Reshimgath : अभिनेत्रीने रुग्णालयातील काही फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून तिचे चाहतेही चिंता व्यक्त करत आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ(Mazi Tuzi Reshimgath)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत नेहा आणि यशची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. तशीच या मालिकेत मीनाक्षी वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल(Swati Deval)ने देखील घराघरात पोहचली आहे. या मालिकेमधील स्वातीच्या भूमिकेनेही प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. चला हवा येऊ द्यामधील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवलची ती स्वाती पत्नी आहे. स्वातीने शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्वाती देवल हिने रुग्णालयामधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तिची नुकतीच एक सर्जरी झाली आहे.  याबद्दल तिने सांगितले की, कालच माझी एक छोटी सर्जरी झाली. आता मी ओके आहे. स्वामींचा कृपा आशीर्वाद, तुम्हा सर्वांचं प्रेम यामुळेच हे शक्य झालं. स्वामी दत्त कृपा मला वेळोवेळी मिळते. पण विशेष म्हणजे यावर्षी जाणते, अजाणतेपणी खूप लोकांचे मनापासून आशीर्वाद मिळाले. हे ते पुण्य असं कामी येतं. मी मनापासून तुमची आभारी आहे. अजून फक्त एक आठवडा काळजी घ्यायची आहे. बस्स… पण तरीही मी ओके.

पुढे तिने पतीचं कौतुक करत म्हटले की, नवरा तर सेवेत हजर होता. भाग्य लागतं बरं का असा नवरा मिळायला. पण खरंच तुषारने अगदी पेज बनवून भरवण्यापासून ते पाय दाबून देणे अगदी सगळे केले. लव्ह यू तुष्की.” याशिवाय स्वातीने रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्माचाऱ्यांचेही आभार मानले.