The 50 Grand Finale : हिंदी टेलिव्हिजनवरील सध्याचा सर्वात गाजलेला आणि आगळावेगळा रिअॅलिटी शो 'द ५०' (The 50) आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ५० स्पर्धकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता केवळ काही मोजक्या स्पर्धकांपर्यंत येऊन थांबला आहे. मात्र, यात सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे, 'द ५०' शोमध्ये सहभागी झालेल्या एका मराठमोळ्या स्पर्धकाला फिनालेचे तिकीट मिळाले आहे.
तो आहे 'रिअॅलिटी शोचा किंग' मानला जाणारा शिव ठाकरे. शिवनं थेट फिनालेमध्ये धडक मारली आहे. बुधवारी पार पडलेल्या अटीतटीच्या टास्कमध्ये शिव ठाकरेने आपल्या जिद्दीच्या जोरावर 'तिकीट टू फिनाले' पटकावलं आहे. या विजयामुळे शिव आता अधिकृतपणे या शोचा फायनलिस्ट बनला असून, विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी तो सज्ज झाला आहे. शिवसोबतच रजत दलाल, मिस्टर फैजू आणि इम्मोर्टल काका यांनीही अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
मराठी कलाकारांचा डंका'द ५०' च्या पहिल्या पर्वात अनेक मराठी चेहरे पाहायला मिळाले. निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, आर्या जाधव आणि शिव ठाकरे अशा तगड्या खेळाडूंनी या शोमध्ये सहभाग घेतला होता. जान्हवी किल्लेकरची नुकतीच एक्झिट झाली असली, तरी शिवने मात्र आपला गड राखला आहे. शिवने यापूर्वी 'बिग बॉस मराठी'चे विजेतेपद मिळवले आहे आणि 'बिग बॉस हिंदी'मध्ये तो उपविजेता ठरला होता. तर आता शिवनं 'द ५०'ची ट्रॉफी उचलावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.
कधी होणार महाअंतिम सोहळा?माध्यमांच्या वृत्तानुसार, या शोच्या ग्रँड फिनालेचे शूटिंग १९ फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडत आहे. मात्र, हा भाग २२ मार्च २०२६ रोजी कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित केला जाईल. या शोच्या विजेत्याला ५० लाख रुपयांची मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. आता हा ५० लाखांची रक्कम आणि 'द ५०' ची मानाची ट्रॉफी शिव ठाकरे महाराष्ट्रात घेऊन येणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Web Summary : Shiv Thackeray, a Marathi contestant, has reached the finale of 'The 50'. He secured his spot after winning a tough task. The grand finale will be shot on February 19th and telecast on March 22nd, 2026. The winner gets ₹50 lakh.
Web Summary : मराठी प्रतियोगी शिव ठाकरे 'द 50' के फिनाले में पहुंचे। एक कठिन कार्य जीतने के बाद उन्होंने अपना स्थान सुरक्षित किया। ग्रैंड फिनाले की शूटिंग 19 फरवरी को होगी और 22 मार्च, 2026 को इसका प्रसारण किया जाएगा। विजेता को ₹50 लाख मिलते हैं।