Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तिचं असं निरागस हसू आहे म्हणूनच...", अभिनेत्री अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 17:18 IST

Ashwini Mahangade :अश्विनी महांगडे हिने सोशल मीडियावर ट्रेडिशनल फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) ही मराठी सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमध्ये काम करते आहे. यात तिने अनघाची भूमिका निभावली आहे. या मालिकेनंतर अश्विनीच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ झाली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर ट्रेडिशनल फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अश्विनी महांगडे हिने गुढी पाडव्याच्या निमित्ताने ट्रेडिशनल फोटोशूट केले आहे. ते फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, तिचं असं निरागस हसू आहे म्हणूनच की काय घराला घरपण आहे...(हा फोटो त्या प्रत्येक मुलीसाठी जी तिच्या हसण्याने, असण्याने घराचा आत्मा जिवंत ठेवते.) इन फ्रेम : ती (अश्विनी महांगडे). अश्विनी महांगडेच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

वर्कफ्रंट...अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. तिने टपाल, बॉईज, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करताना पाहायला मिळते.

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका